अंक – मोहिनी, दिवाळी १९५४
पुष्कळ नांवें, गांवें आणि शब्द असे चमत्कारिक असतात, कीं ते वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्याला गंमत वाटते. कांहीं कांहीं शब्द तर असे असतात कीं ते माहीत होईपर्यंत तसा शब्द असूं शकतो याची पुसटशी कल्पनासुद्धां आपल्याला येत नाहीं. हे शब्द किंवा नांवें आणि गांवें त्यांच्या विचित्रपणामुळे आपल्या डोक्यांत उगीचच कायमचें ठाण मांडून बसतात. त्यांतल्या कित्येक नांवागांवांचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशीं सुतराम संबंध नसतो. अशींच कांहीं नांवें, गांवें आणि शब्द मी खालीं देत आहे.
'दिब्रुगढ' हें गांवच घ्या. हें गांव त्याच्या चमत्कारिक उच्चारामुळे माझ्या डोक्यांत फिट बसले आहे. मात्र हे गांवाचें नांव ऐकण्यापूर्वी असें गांव या अवनीतलावर असूं शकेल अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु आता मात्र मला हे गांव अगदी पाठ झालेले आहे. 'दिब्रुगढ' म्हटलें कीं, तो ब्रह्मपुत्रेचा पूर, तें गांवांत पाणी शिरणें, तें लोकांचें निराश्रित होणें, तो 'दिब्रुगढ-निवासी-पूरग्रस्त-निराश्रित-गृह-वित्तविहीन साहाय्यक निधि' हे सारे कसे चित्रपटासारखे भराभर माझ्या दृष्टीसमोरून जातें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .