एकादी गोष्ट एकदा त्यांनी करावयाची म्हणून ठरविली म्हणजे मग मात्र त्यांना मुळीच आळस नाहीं. ते अगदी त्या गोष्टीचा ध्यास घेऊन पिच्छा पुरवितात व साध्य सिद्ध होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत व चिकाटी सोडीत नाहीत. महाराष्ट्राचें स्वतंत्र विद्यापीठ झाले पाहिजे असे वाटल्यावर त्यांनी सतत वीस वर्षे त्या गोष्टीची पाठ घेतली व अखेर तें घडवून आणले. त्या विद्यापीठाला देण्यासाठी त्यांनी कित्येक हजार रुपयेसुद्धां जमवले आहेत. 'संयुक्त महाराष्ट्र' हा भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर झालाच पाहिजे, हें पटल्यावर त्याच्या निर्मितीसाठी ते तनमनधन पणाला लावून कित्येक वर्षांपासून झगडत आहेत. आणि कोणी विरोधी बोलला अगर आक्षेप घेतला तर त्याच्यावर मोठ्या हिरीरीने ते तुटून पडत आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .