अस्वस्थता ! अस्वस्थता ! अस्वस्थता त्याचें जीवन व्यापून राहिली होती. त्याला चोहों बाजूंनी ओरबाडत होती. तेंच त्याच्या जीवनाचे पालुपद होतें. शाळेत असतांना कविता पाठ म्हणण्याची पाळी होऊन जाईपर्यंत वाटणारी अस्वस्थता आपल्याला अभ्यास येतो व आपण पतंग पकडण्याकरितां कौलावर चढत नाही म्हणून वाटणारी अस्वस्थता, काव्य वाचतांना आपण तन्मय होत नाही म्हणून वाटणारी अस्वस्थता आणि सुमतीच्या सहवासात आपण पागल बनतो म्हणून वाटणारी अस्वस्थता. आपण दुसऱ्यांचे कुत्सित बोलणें मुकाट्याने सहन केले म्हणून वाटणारी अस्वस्थता आणि आपण दुसऱ्याशीं उर्मटपणानें वागतो म्हणून वाटणारी अस्वस्थता. आतली इच्छाशक्ति तीव्र झाली तर विवेक कमी होईल म्हणून वाटणारी अस्वस्थता !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Varsha Halabe
10 महिन्यांपूर्वीNisargache ase varnan mee pahilyandach vachte aahe! Vegli shaili...