पुन्हा…पुन्हा...तेंच…तेंच, तसेच दिवस लोटले जात होते. काळाच्या बरणींत दिवसांचं लोणचं घातलं जात होतं. रात्रीच्या मुस्कटांत कुणीतरी नीरव थपडा लगावीत होतं... त्यामुळं तिच्या नजरेसमोर नक्षत्रांचे काजवे चमकून तीसुद्धां उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या आड मूर्च्छना येऊन पडत होती. आणि शांतारामचे मन आयुष्याच्या रुपेरी वाळूवरून बऱ्यावाईट हेतूंचे मनोरे उभवीत पुढं सरकत होते. नियति नांवाची कुणीतरी स्त्री, शांतारामच्या आशाआंकाक्षांची रसाळ लिंबं बिनघोरपणे व्यवहाराच्या विळीवर चिरीत बसली होती... विमलनं सुचवलेल्या घड्याळाची आठवण शांतारामच्या मनाचे काटमुंगीसारखे चावे घेत होती...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .