या भूमिकेचें पर्यवसान 'Death in the Afternoon' या पुस्तकांतील 'Madame is no remedy for anything in life' महावाक्यांत होतें. वस्तुतः हें सर्वच तत्त्वज्ञान या अवस्थेत आगंतुक वाटू लागतें; तें हेमिंग्वेचें असतें, त्याच्या व्यक्तींचें नसतें. कारण, अनुभवाचे पृथक्करण करून अधिक सूक्ष्म सत्याचे अवगाहन करण्याची धारणा त्यांच्याजवळ असू शकत नाहीं. त्यांचें सेंद्रिय जीवन आपल्या परीने परिपूर्ण असते; एकात्म असतें. आणि हे आपल्या अनुभवाला येण्यांतच हेमिंग्वेच्या वाङ्मयीन व्यक्तित्वांत निर्माण होणाऱ्या विघटनेचीं पूर्वचिन्हें होत. त्याचा लेफ्टनंट हेन्री सुद्धां "I was not born to think. I was made to eat My God, Yes. Eat, drink and sleep with Catherine.” असें प्रतिपादीत असतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .