हिंदुत्वनिष्ठ वृत्तीची जोपासना महाराष्ट्रांत सुरू झालेल्या व विस्तार पावलेल्या आणखी एका संघटनेने केली आणि तिला अधिक संघटित, अधिक तीव्र व अधिक शक्तिशाली स्वरूप दिलें. हिंदु-मुसलमानांच्या दंग्यांनंतर १९२५ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अधिकृतपणे गांधीविरोध शिकविला गेला, असे जरी म्हणणे कठीण असले, तरी त्यांच्या निष्ठेचे पर्यवसान मात्र ते झाले. देशांतील कोणत्याही सामर्थ्यसाधक चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी टपून बसलेल्या ब्रिटिश सरकारच्या कुटिल भेदनीतीनें हे आपल्याला अनुकूल असें गांधी विरोधी पर्यवसान ओळखूनच या निमलष्करी संघटनेकडे काणाडोळा केला. संघाचा राजकारणावर विश्वास नव्हता, अर्थात् लोकशाही आदिकरून राजकीय तत्त्वज्ञानांवरही विश्वास नव्हता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .