ठाकुरद्वारच्या सौ. शाणूबाई त्रिलोकेकर आपल्या नापसंतीदाखल लिहिलेल्या पत्रांत घरच्या पुरुषांबद्दल लिहितात, “आमचे 'हे' किनी, सगळ्या गोष्टींचीं झांकणं लावायला नेमके विसरतात! ह्यांनी उघड्या टाकलेल्या गोष्टींचीं झांकणं लावण्यांत माझा दिवसाचा निम्मा वेळ जातो. दाढीच्या डब्याचं झांकण लावीत नाहींत, लोणच्याची बरणी उघ टाकतात, कपडे काढून घेतात आणि कपड्यांची बॅग ‘आ’ वासून पडलेली असते, कपाटांतल्या चूर्ण आणि भस्माच्या सगळ्या बाटल्यांची बुचं सकाळ-संध्याकाळ मीच लावतें, आणि – कर्म माझं! बाहेर जातांना डोक्यावर टोपी ठेवायलासुद्धां हे किती वेळां विसरतात! आतां तीसद्धां मीच का ठेऊं?...”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .