भाग पहिला - व्हॉल्टेअर

पुनश्च    चिं. वि. जोशी    2024-04-03 10:00:02   

लुई मेला तेव्हां व्हॉल्टेअर एकवीस वर्षांचा होता. लुई आणखी दहा वर्षे जगता तर व्हॉल्टेअरचे लेख फार निराळ्या तऱ्हेनें लिहिले गेले असते. दरबारच्या उग्रतेचा व जडत्वाचा प्रभाव लोकांच्या चालीरीतींत व तत्कालीन वाङ्मयांत स्पष्टपणें प्रतिबिंबित झाला होता. लुईचा उपाध्याय लेटेलियर अगदींच माणूसघाण्या व निर्दय धर्मवेडा होता. तो आपल्या मतानें नास्तिक असलेल्या लोकांचा छळ करण्याच्या नवीन नवीन शकला शोधून काढी. यामुळे त्यावेळीं लिहिलेल्या सर्व ग्रंथांतून धर्मनिष्ठेची छटा उमटलेली व स्वतंत्र विचारांचें खोबरें झालेले दिसून येतें. लुईची उपपत्नी मादामद मेंतेनॉन हिनें व्हॉल्टेअरला धर्मपर नाटकें लिहिण्यास लावलें असतें व इतर दरबारी लोकाप्रमाणें तोही एक ढोंगी बगळा होऊन बसला असता; 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen