पुढील तीन वर्षांत व्हॉल्टेअर फेडरिकला तीनदां भेटला. १७४२ साली त्याचे 'महमद' नाटक रंगभूमीवर आले तेव्हां प्रेक्षकवर्गात त्याची फार वाहवा झाली; परंतु त्याचा दुष्मन् अॅबे दे फॉन्टेन्स व त्याच्या पक्षांतील मंडळीनें हा खेळ पाखंडी मताचा आहे म्हणून त्याविरुद्ध इतके काहूर माजविलें कीं, व्हॉल्टेअरास त्यांतील बराचसा भाग काढून टाकावा लागला. इतक्यांत त्यास फ्रेडरिकनें आपल्या दरबारी राहण्याकरितां निमंत्रण पाठविलें. अक्षरसाम्राज्यांत मिळालेल्या अपयशांमुळे वैतागून आणि दरबारांत उच्चपद मिळाल्यामुळे आपल्या वैर्यांस आपले वांकडें साधण्यास संधि मिळणार नाहीं असा विचार करून सरकारांत खटपट करून तो फ्रान्सच्या वतीने फ्रेडरिकच्या दरबारीं रहाण्यास गेला व तेथें एक आठवडाभर राहिला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .