व्हॉल्टेअर प्रुशियांत असतांनाच त्यानें 'चौदाव्या लुईचा इतिहास' लिहिला; त्यांतील कांहीं मजकूर तर त्याला फ्रान्सति राहून लिहितांच आला नसता, म्हणून त्याचें प्रुशियांत राहणें फ्रेंच वाङ्मयाच्या पथ्यावर पडलें असे म्हणतात. या पुस्तकाची फ्रान्सांत फार वाहवा होऊन तेथील लोक आवडीनें याच्या प्रती वाचूं लागले, परंतु यामुळे फ्रान्सचा राजा १५ वा लुई याची त्याच्यावर मर्जी खप्पा झाली. व्हॉल्टेअर जर्मनींतून फ्रान्सांत जाण्याच्या उद्देशानें निघाला, तो हाईन नदीवर मुक्काम करून राहिला, आणि त्यानें फ्रान्सांत येण्याची परवानगी मागितली; परंतु ती राजानें दिली नाहीं. अशा स्थितींत त्यानें कॉलमर येथें अंथरुणाला खिळून दिवस काढले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .