'विचार' ह्या गोष्टीला साहित्यांत फार प्राधान्य आहे. साहिल म्हणजे केवळ भावनांचाच खेळ अशी कोणी समजूत करून घेणे अत्यंत चुकीचे आहे. मी नेहमीच असें म्हणत असतों की, कलाकृतीची रचना तर्काच्या आधारे केलेली नसते आणि तिच्यांतून कुठचेहि तत्त्वज्ञान व्यक्त होऊं शकत नाही. पण ह्याचा अर्थ असा नव्हे कीं, कलाकृतींत विचारधन (Intellectual content) नसावें, भावनांप्रमाणे विचार हे देखील प्रत्येक अनुभवाचे एक अंग आहे आणि तें छाटून टाकले अगर दुबळे असले तर त्या अनुभवाची व त्यावर आधारलेल्या कलाकृतीची किंमत पुष्कळच कमी होते. पेंडश्यांच्या कादंबरींतील विचारधन चांगले भरीव असतें. आणि त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांचा मनावर व्यापक असा परिणाम होतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .