हरूण नांवाचा एक विनोदी नटहि केवळ वेंधळ्या व्यक्तीमत्वामुळे चित्रपटसृष्टींत मागे पडला आहे. बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत' या चित्रपटांतील मॅनेजरच्या विनोदी भूमिकेत त्यानें तुफान अभिनय केला होता. फिल्मिस्तानच्या 'शिकारी' या चित्रपटांतील मुनिमाची त्याची भूमिकाहि उल्लेखनीय होती. आणि त्या चित्रपटांतील 'नोट करलो' हें त्यानें वारंवार उच्चारलेलें वाक्य ऐकताच चित्रपटगृहांत प्रचंड हंशा पिकत होता. 'सरगम' या चित्रपटातील 'बुडवा घोडा'ची त्याची भूमिकाहि विनोदी होती. पण केवळ वेंधळ्या व्यक्तीमत्वामुळे हा नट मागें पडला. मधु आपटे या लोकप्रिय महाराष्ट्रीयन नटाच्या बाबतीतहि हीच गोष्ट घडली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .