आमरणांत कर्म करीत राहण्याचा भगवंतांनी अर्जुनास केलेला हा गीतारूपी उपदेश त्यास पटल्याबद्दल जर त्याने आपल्या तोंडानें कबूली दिली होती, तर त्यानें स्वतः तसें वर्तन कां केलें नाहीं ? धर्मादिकांस वरील उपदेश झाला नव्हता, ह्मणून, कांहीं काळ राज्य केल्यानंतर महाप्रस्थानासाठी त्यांनीं अरण्यवास पत्करिला, हें ठीक झाले; परंतु निदान अर्जुनानें तरी तसें करावयाचें नव्हतें. धर्मराजांनी परिक्षितास राज्यावर बसविलेंच होतें; त्याचें रक्षण करीत व प्रसंगप्राप्त इतर कर्मे करीत आमरणांत नगरांतच रहावयास त्यास कोणती हरकत होती ? भीष्माचार्यांनी निरपेक्षपणानें मरेपर्यंत आपलीं कर्तव्यकर्मे केलीच कीं नाहीं ? तसेंच अर्जुनानेही करावयास पाहिजे होतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .