रहस्यकारांच्या मताप्रमाणे अर्जुन ज्ञानी होता असें ह्मटलें तर त्यास मी कर्म सोडूं की करूं अशी शंका येण्याचे कारण नव्हतें. मी कर्म करणारा, त्या कर्मांचें फळ मला भोगावें लागेल, राज्य प्राप्तीसाठी युद्धास आह्मी सिद्ध झालों, हें खरें, तथापि, आता हे आपले नातेवाईकच आपले प्रतिपक्षी ह्मणून युद्धास उभे राहिलेले पाहून, असें वाटू लागतें कीं यांस मारून, आपल्या हाताने आपला कुलक्षय करून घ्यावा आणि परलोकीं नरकाचे साधन करावे त्यापेक्षां राज्याची आशा सोडून भीक मागावी, अगर आपल्या प्रतिपक्ष्यांच्या हातून मृत्यु पत्करावा हें मला बरें वाटतें असें अर्जुनाचें ह्मणणें होतें. ज्ञानी पुरुषांस असें कधींच वाटणार नाहीं. अर्जुनाच्या या विषादांत संन्यासाचें नांव सुद्धां नाहीं,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .