वस्तुतः ब्रह्मविद्येचा उपदेश उपनिषदांत वर्णिल्याप्रमाणे हळू हळू चढत्या उपासना सांगून करावयास पाहिजे, कारण, तसे न केल्यास मोक्षप्राप्तीच्या उत्सुकतेमुळे मधल्या पाय-या सोडून एकदम उडी मारण्याची साधकास इच्छा होईल, व त्यामुळे फायदा होण्याऐवजी त्याचे पाय मात्र मोडतील अशी भीति असते. असें असतां भगवंतांनी अर्जुनास एकदम ब्रह्मविद्या कां सांगितली याची दोन कारणें संभवतात. पहिले कारण, पायरीपायरीनें ज्ञान सांगत बसावयास रणांगणांवर वेळ नव्हता; त्यास स्वस्थता लागते. व दुसरें कारण अर्जुन त्यांचा परमप्रिय मित्र होता. त्याचा उद्धार उपदेशानें झाला नसता तर आपलें दैवी सामर्थ्य उपयोगांत आणूनसुद्धा त्यांनी तो केला असता
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .