मी आतां तुझ्यासाठीं एक मोठा गुप्त धन संग्रह शोधणार आहे. त्यानें तुझें अति कल्याण होईल. भूत भविष्य कळेल. आणि पुण्यसंग्रहसुद्धां होईल. तो घेऊन तूं स्वगृही जा, कारण संसारी माणसानें धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षाची सर्वसिद्धी गांठली पाहिजे. शास्त्राध्ययन हैं आदी कर्तव्य आहे. मूर्ख लोक पुण्याच्या खोट्या कल्पनेने केवळ तीर्थयात्रा करतात. मी उज्जयिनीच्या अवंती नगरी महाकालाच्या दर्शनार्थ जात आहे. ते आम्हा कापालिकांचे महाक्षेत्र आहे. तिथे पशुपतीचे उपासक त्रिशूळानें लढाया करतात, माझा एखादा गुरुबंधू मला एखादेवेळीं तेथे ठारही करील, जादुगाराच्या टोपलीत त्या पोराला केव्हा तरवार लागेल त्याचा कांहीं नेम आहे का?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .