जगांत जेवढे थोर पुरुष किंवा स्त्रिया होऊन गेल्या, त्यांत मोठेपणाचें खरें कारण त्यांचे नैष्ठिक वर्तन होय. त्यांच्या मोठमोठ्या कार्यांतील यशाचे कारणही तेंच, हीं सर्व माणसें वाचेची धड. वेळेची पक्की आणि अत्यंत नियमित वागणारी. एकदां त्यांनीं अमुक गोष्ट, अमुक वेळीं, अशी करावयाची म्हटली कीं, ती करावयाचीच. मग त्यांत तीन तेरा करावयाचे नाहींत, कसलाही संदेह धरावयाचा नाहीं किंवा कोणत्याही अडचणीस जुमानावयाचें नाहीं. आमच्या पुष्कळशा कार्यांत पुष्कळ ठिकाणी आणि पुष्कळ वेळां या निष्ठेचा पूर्ण अभाव आढळतो. त्याचा परिणाम असा होतो कीं आमच्यांत तेज किंवा बळ निर्माणच होत नाहीं आणि आत्मविश्वास तर आमचेकडे फिरकतही नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .