अर्जुन ज्ञानी होता किंवा अज्ञान होता या मुद्यावर गोविंदसुतांची टीका फार मुद्देसूद व लोकमान्य टिळकांचे दांत त्यांच्याच घशांत घालण्यासारखी आहे असें आम्हांस वाटतें. ज्ञानोत्तर कर्म, या शब्दावरील व तत्त्वावरील त्यांची विनोदप्रचुर वेलबुट्टी तर वाङ्मयांत कायम राहील असें वाटतें. वास्तविक पहातां 'ज्ञानोत्तर' या शब्दांतील 'ज्ञान' शब्दाचा अर्थ लोकमान्यांनीं मुग्ध ठेवण्याचें कांहींएक कारण नव्हतें. एका पक्षीं ज्ञान व मोक्ष हे समानार्थी आहेत. अशा अर्थी रहस्यकार 'ज्ञानोत्तर कर्म' या पदसमूहांत ज्ञान हा शब्द वापरीत नाहींत हे उघडच आहे. नाहींतर ज्ञानोत्तर कर्म मोक्षाला नेतें या वाक्याचा अर्थ मोक्षोत्तरकर्म मोक्षाला नेतें असा करावा लागेल; मग तें किती हास्यापद होतें हे सांगण्याची जरूर नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .