कब-कलश आणि कृष्णाजीपंत यांच्या नांवांत खाफीरखानानें केलेला घोटाळा आणखी एके ठिकाणी आढळतो. कारण संभाजीकालीन हरी कवीच्या 'शंभुविलास' किंवा 'शंभुराजचरितम्' नांवाच्या एका संस्कृत काव्यांत कृष्णपंडित या नांवाचा संभाजीचा गुरु असल्याचें कथानकांत गोविलें आहे. किंबहुना या कृष्णपंडिताच्या सांगण्यावरूनच हरी कवीनें हे काव्य लिहिलें होतें, आणि या कृष्णपंडित नामक संभाजीच्या गुरुला कथानकांत पुष्कळ महत्त्व दिलें आहे. हा संभाजीचा गुरु कृष्णपंडित कवि कलशच असावा असें इतिहास तज्ञांचे मत आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .