शेखपुरा येथील सण्टेमधील कत्तल मानवी वृत्तींना कलंकित करणारी अशी होती. घराबाहेर पडूं नका, तुमची कत्तल होईल म्हणून कर्फ्यूचा अंमल जारी करण्यांत आला व संध्याकाळी सबंध हिन्दू-शीख वस्तींना आगी लावून देण्यांत आल्या. बाहेर पडावें तर सैनिकांच्या गोळीला बळी व आंतच बसून राहावे तर आगीच्या भक्ष्यस्थानी. अशा परिस्थितीत पंधरा हजार हिंदु आणि शीख, स्त्री व पुरुष, तरुण व बुद्ध, रांगणारी, स्तनपान करणारी लहान लहान अर्भके सारेजण असहाय्य अनाथाप्रमाणें आगीच्या भक्षस्थानी पडले. हजारों वर्षांपासूनची अनेक धर्माची थोर शिकवण असूनहि माणूस शेवटी कसा वागतो- पशुलाहि लाजविणारी कृत्यें तो किती सहजतेने करतो- हें पाकिस्तानांत आणि भारतांतहि जागोजागीं ज्या घटना घडल्या त्यानें सिद्ध केले आहे. मुसलमानांनी केलें म्हणून हिंदूंनी केलें आणि हिंदूंनी केलें म्हणून मुसलमानांनीं केलें. पण या सगळ्या प्रकारांत समाज उध्वस्त झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .