मुहाफिज- एक देखणी आणि दर्जेदार खंत


भाषा आणि संस्कृती यात जर काळानुरूप बदल झाला नाही तर त्या लुप्त होण्याची शक्यता अधिक असते. लखनऊ, भोपाळ आदी शहरांची खास वैशिष्ट्य असलेली ‘पहले आप – पहले आप’ अशी अती अदबशीर मुस्लिम संस्कृती व अनेक शायरांना ‘हाल-ए-दिल’ आणि दस्तूर-ए-जमाना सांगण्यासाठी नजाकतदार, लफ्फेदार शब्द भांडारं खुली करून देणारी उर्दू भाषा या दोन्ही आजघडीला ‘जाने कहाँ गये वो दिन’ अशी खंत व्यक्त करण्यापुरत्या शिल्लक उरल्या आहेत. या भाषेत नियतकालिकं अजूनही प्रकाशित होतात परंतु व्यवहारातून ती भाषा हद्दपार झाली आहे. उर्दू जिवंत आहे ती केवळ गालीबपासून तर बहादूरशाह जफरपर्यंतच्या शायरांनी आपल्या भावनांना उर्दूचं अंगडं घातलं म्हणून! एकेकाळी राजवैभव उपभोगलेल्या या भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल खंत व्यक्त करण्यासाठी मर्चंट आयव्होरी प्रॉडक्शन्सनं ‘मुहाफिज’ (इंग्रजीत ‘इन कस्टडी’) या अतिशय परिणामकारक चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात उर्दू भाषा ही मुख्य विषय म्हणून येत असली तरी प्रत्यक्षात ती प्रतिक  म्हणून वापरलेली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षाचं रूप घेऊन ती वैश्विक आशय सांगते. परंपरा श्रीमंत, संपन्न असल्या तरी त्या कालौघात कधीतरी कालबाह्य ठरतातच,त्या थोपवू पाहणारेही आपण हे थांबवू शकणार नाही हे माहिती असून लढत असतात. हा चित्रपट एक प्रकारे  परंपरांचं शोकगीत आहे 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , लोकसत्ता , भाषा , व्हिडीओ , चित्रस्मृती , चित्रपट रसास्वाद , लोकसत्ता , भाषा , व्हिडीओ , चित्रस्मृती

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    परीक्षणाचे परीक्षण काय करणार? त्यात सामना तांबिदुराईशी! मात्र हा त्यांचा प्रांत नव्हे असे वाटते!!

  2.   4 वर्षांपूर्वी

    YouTube la film milat nahi

  3. Chayakishor

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान.

  4. Devendra

      6 वर्षांपूर्वी

    चित्रपटाचे परीक्षण म्हणून हा लेख तितकासा उठावदार नाही झाला. मुळात हा एका प्रतिथयश लेखकाने लिहिला असल्याने जरा असंवेदनशील तर आहेच आहे. निरीक्षण म्हणून योग्य, अतिशय परखड आणि अभ्यासू, मात्र परीक्षण म्हणून 'BETWEEN THE LINES' न वाचलेला असा हा लेख वाटतो. काही 'MISSING LINES' ज्या परीक्षणात नाही आल्या त्या पुढीलप्रमाणे - "दुरस्य पर्वत: रम्य: ही उक्ती शिकविणारा हा चित्रपट 'bullfighter' वा 'घाशीराम कोतवाल' या कालाकृतीप्रमानेच प्रतीकात्मक. 'घाशीराम कोतवाल' मध्ये राजसत्ता तात्पुरत्या लाभासाठी एका चळवळसदृष्य वळवळीस जन्मास घातले नि तीच वळवळ शेवटी आटोक्याबाहेर होते. 'बुलफायटर' मध्ये प्रकाशझोत, प्रसिद्धी (limelight, spotlight) यातील उगवता सूर्य मावळतीस जातो त्यावेळची मनस्थिती नि जगर्रहाट यांचे प्रतीकात्मक दर्शन घडवतो तर 'मुहाफिज' हा चित्रपट मात्र एकच एका प्रतिकाशी प्रामाणिक नाही. एक खुले पुस्तक ज्यातून तुम्ही घ्याल तो अर्थ अशा रीतीने अगदी मोकळेपणाने समोर येतो. कोणतीही प्रतिक्रिया वा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक वा मूळ लेखक देत नाही नि सोपेपणाने देखील काही यात शोधून सापडत नाही. अर्थ मात्र खूप निघतात, नि तेच अभिप्रेत असावे कदाचित दिग्दर्शक वा मूळ लेखक यांना. दुरस्य पर्वत: रम्य: हा साक्षात्कार मला होतो या चित्रपटातून. "स्वतःस कलाकार समजणारे आणि ते खरोखर तसे मोठे असणारे कलाकार (मग ते लेखक, कवी, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक) असोत ते एकजात असे 'आत्ममग्न', 'स्वप्रतिमा प्रिय' होतात की माणुसकी, स्ववेदना यापासून ते इतके दूर का जावेत? आत्ममग्नतेत नि स्वप्रतीमेच्या प्रेमात आजूबाजूला काय चालले ते काहीच कसे जाणवत नाहीत. यांच्या संवेदनशील विचारांतून जन्मलेल्या उत्तम कलाकृती प्रसाविणारे हे कलावंत प्रसंगी इतके असंवेदनशील होऊ शकतात याचा एक वस्तुपाठ म्हणावा असा हा चित्रपट. "काहीही स्वार्थ नाही की कोणतीही वैयक्तिक आकांक्षा नाही, केवळ कलाकाराच्या कलाकृतींवर प्रेम, त्याच्या काव्यावर प्रेम म्हणून कोणी एक परगावातील एक मध्यमवर्गीय प्राध्यापक एका प्रतिथयश कवीच्या संपर्कात येतो, कवीच्या सहवासात त्याच्यावर विनाकारण आलेले कडवट अनुभव केवळ काविवरच्या त्याच्या प्रेमापोटी तो सहन करतो, व्यसनाधीन कवीची ओकारी उचलतो, इतकेच काय कवीच्या भोवतालचे स्वार्थी, लंपट शागीर्द यांचे लाड पुरविता आर्थिक अडचणीत देखील सापडतो. यातून त्याला कवीकडून काय मिळते तर केवळ उपेक्षा नि कवीच्या भोवतालच्या लोकांची अवहेलना. कवीच्या मरणानंतर त्यास प्राप्त होते काविद्वारे कवीच्या अनावृत कवितांचे भेट म्हणून मिळालेले बाड. ज्याचे पुनरुथ्थान म्हणजे देखील एक मोठी जोखीम. दरम्यान या कवीच्या सानिध्याचा परिणाम घरी कौटुंबिक पातळीवर, कामावरील तणाव यात होतो ती वेगळीच गोष्ट. "प्रतिथयश म्हणाव्या अशा या कलाकारांच्या जवळ जाणे देखील किती जोखमीचे हेच सांगण्याचा प्रयत्न जणू हा चित्रपट. "कलाकाराच्या जवळ फार जावू नये, छोटा म्हणून म्हणून गेलात तर जळून जाल हे प्रामाणिकपणे सांगणारा हा चित्रपट" - देवेंद्र रमेश राक्षे

  5. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद, तुमची सूचना नक्की बोजेवारांच्या कानावर घालू. आणि शक्य झाल्यास त्यावर कामही करू.

  6. Nishikant

      6 वर्षांपूर्वी

    'मुहाफीज' हा न पाहीलेला सिनेमा असा चोवीस वर्षानंतर उत्तम वर्णनासह समोर येणे म्हणजे भरजरी वस्त्रात लपेटून ठेवलेला अनमोल हिरा हाती लागल्याचा आनंद झाला ! श्रीकांत बोजेवारांना या विषयावर प्रत्यक्ष बोलायला लावून पुनश्च सादर केलेत तर परमानंद होईल.

  7. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    सूचनेबद्दल धन्यवाद. सुधारणा केली आहे...अशा चुका दाखवलेल्या आम्हाला आवडतील. तुमच्या प्रतिक्रियेचा आपल्या 'प्रतिसाद स्पर्धेसाठी' याचा जरूर विचार केला जाईल.

  8. vrudeepak

      6 वर्षांपूर्वी

    उत्कृष्ट चित्रपट समीक्षा.

  9. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    उत्कृष्ट चित्रपट समीक्षा कशी असावी याचा वस्तूपाठच. आज काल असे परीक्षण वाचायला मिळणे कठीण झाले आहे

  10. PriyaAJ

      6 वर्षांपूर्वी

    खूप वर्षांपूर्वी दूरदर्शन वर पाहिला होता मुहाफिज़. बाकीचा चित्रपट फारसा आठवत नाही पण नूर ची मुलाखत रेकॉर्ड करण्याचा प्रसंग चांगला आठवतोय...न विसरता येणारा प्रसंग!

  11. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मुळात असा चित्रपट आला होता, हेच माहित नव्हतं.. हा चित्रपट इतर चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवून गेला असावा. उर्दू ही भारतीय भाषा आहे.. ह्या भाषेला “हिंदुस्तानी” असेही म्हणतात.. पूर्वी, गिरगावात चर्नीरोड स्टेशन जवळ “हिंदूस्तानी प्रचार सभा” मार्फत उर्दू भाषेचे वर्ग, मोफत घेतले जात असत.. आताची परिस्थिती माहित नाही... उर्दू शब्दाचा अर्थ “लष्कर” असाही होतो.. उर्दूला खानदानी अदब आहे.. ही भाषा भारदस्त आहे.. तर हिंदी भाषेत माधुर्य आहे..... एक आपुलकीची सूचना.... “इर्षाद” असं न लिहिता “इर्शाद” असं लिहायला हवं होतं.. मसालेभातात खडा लागल्यासारखे वाटले.

  12. mangeshnabar

      6 वर्षांपूर्वी

    पुनश्चच्या आजच्या अंकातील श्रीकांत बोजेवार यांनी केलेल्या चित्रपट परीक्षणाचा लेख आवडला. मी हा चित्रपट पाहिलेला नाही मला उर्दूचे आकर्षण नाही ( तसेच मनात तिरस्कार नाही ) पण हा लेख वाचताना ती उणीव मला भासली नाही म्हणून ते कळवण्यासाठी हे लिहीत आहे. कदाचित या लेखासोबत चित्रपटाची क्लिप देण्याची गरज नाही असे वाटते. हा माझा वैयक्तिक प्रश्न असेल. अशी रसिकतेने भरून टाकलेली परीक्षणे आज येत नाहीत असे नाही वाटत ? कुठे गेले सारे समीक्षक आज ? श्रीकांत बोजेवार हे तर आजच्या काळातले लेखक आहेत. लेख १९९४ वर्षांमधील आहे. याकडे लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. धन्यवाद कसे म्हणू ? आपण जे देत आहात त्याची काही अंशी भरपाई म्हणून हे मत लिहिले. मंगेश नाबर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen