अंक- वसंत; वर्ष- जुलै १९६४ " राजवाड्यांना मराठी साहित्य संमेलनाचे कधीही अध्यक्षपद मिळाले नसल्याने, मला आज हे पद भूषवायला संकोच होतोय " या प्रकारची खंत ज्यांच्याविषयी कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, खुद्द दुर्गाबाई भागवत व्यक्त करतात, असे थोर इतिहासकार म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. (जीवनकाल - २४ जून १८६३ ते ३१ डिसेंबर १९२६) इतिहासाचार्य ही सार्थ पदवी मिळालेले वि. का. राजवाडे यांचे इतिहासातील संशोधनातील योगदान अमुल्य आहे. त्यांच्या पश्चात एकाही भारतीय संशोधकाला राजवाड्यांना टाळून आपला अभ्यास पूर्ण करता आलेला नाही. अश्या राजवाडे यांचे छोट्या छोट्या प्रसंगातून उमलणारे व्यक्तिदर्शन १९६४ साली वसंत मासिकात श्री. सदानंद चेंदवणकर यांनी घडवले आहे. - ******** काळ आला होता पण वेळ आली नव्हती ऎतिहासिक स्थळे, किल्ले, शिलालेख, जुनी कागदपत्रे ही इतिहासांची साधने साऱ्या भारतखंडात विखुरलेली आहेत. या निमित्ताने ठिकठिकाणी हिंडताना काही वेळेस भयंकर तोंड देण्याचे प्रसंग कै. विसूभाऊ राजवाडे यांच्यावर आलेले होते. त्यापैकी एक जिवावरचा प्रसंग असा- मुंबईजवळील समुद्रात खांदेरी उंदेरी या नावाचे एक ठिकाण आहे. संशोधनाच्या दृष्टीने हे पहावे असे विसूभाऊंना वाटले. सागरभारतीच्या वेळी कुलाब्याच्या दांडीपर्यंत गेले. तिथे निरीक्षण करण्यात ते इतके मग्न झाले की संध्याकाळ कधी झाली ते त्यांना कळले देखील नाही. रात्र पडू लागली. आणि तेथल्या पहारेकऱ्याने येथे रात्रीचे रहावयाचे नाही अशी जेव्हा सूचना दिली तेव्हा ते कुठे भानावर आले. ते परत निघाले पण भरती चढत चालली होती. होडी मिळण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandol Deshpande
4 वर्षांपूर्वीवा खुपच विचार करणारी माहिती.
Pranav Patil
4 वर्षांपूर्वीखुपच छान माहिती इतिहासाचार्यंबदल भेटली धन्यवाद
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीराजवाड्यांविषयी एवढी माहिती पहिल्यांदाच वाचली. थक्क झालो.
[email protected]
5 वर्षांपूर्वीराजवांडेच्या संपूर्ण जीवनपटाचे चलचित्र अंत:चक्षुंसमोर दिसले.
sakul
7 वर्षांपूर्वीअफाट व्यक्तिमत्त्वाची केवळ झलक दाखवणारे काही सुंदर किस्से!
[email protected]
7 वर्षांपूर्वीक्या बात है |
Nishikant
7 वर्षांपूर्वीअशा जगावेगळ्या व्यक्तींकडून च अफाट, अचाट कार्य घडते.
prithvithakur1
7 वर्षांपूर्वीइतिहासाचार्य राजवाडे यांच्यावरचा हा लेख अतिशय आवडला. असाच एखादा लेख त्यांचे शिष्योत्तम महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यावर सुद्धा असेल तर उपलब्ध करून द्यावा. कारण पोतदार यांचेही कार्य फार थोर आहे. दुर्दैवाने इतिहासाचार्य राजवाडे यांच्या इतके व्यापक संशोधन पोतदार करू शकले नाहीत. राजवाड्यांनी पुष्कळ लिहिले व पुष्कळच प्रकाशित केले. त्यामानाने पोतदार क्षमता असूनही तितके लिहू शकले नाहीत. कारण त्यांचा भिडस्त स्वभाव. अनेक लोक पोतदारांकडे सतत माहिती घेण्यासाठी तर कधी गप्पा मारण्यासाठी येत असत. अनेक जण त्यांना विविध संस्थात्मक कार्यातही गुंतवून ठेवत असत आणि पोतदारांना त्यांची भीड मोडवत नसे. त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया गेला. अशा प्रसंगी राजवाड्यांचा सडेतोड व फटकळ स्वभाव उपयुक्त ठरत असे. प्रस्तुत लेखात राजवाडे यांच्या दिनचर्येची व त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची सुंदर माहिती दिली आहे. राजवाड्यांचे छानसे व सविस्तर असे चरित्र त्यांचे एक शिष्य भास्कर वामन भट यांनी सुद्धा लिहिले आहे. परंतु खेदाने नमूद करावेसे वाटते की राजवाड्यांच्या कार्यापेक्षा व त्यांच्या कार्याच्या थोरवी पेक्षा त्यांच्या स्वभाववैचित्र्यांवर व त्यांच्या तर्हेवाईकपणाबद्दलच जास्त बोलल्या व लिहिल्या गेले आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने राजवाड्यांनी अनेक खंडांमध्ये प्रकाशित केली. हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे. त्यांनी पुढील संशोधकांना या कार्याने कायमचे ऋणी करून ठेवले आहे. भाषांतराच्या क्षेत्रातही राजवाड्यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांनी 'भाषांतर' नावाचे एक नियतकालिक काढले होते व त्याद्वारे अनेक उत्तमोत्तम इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद मराठीमध्ये प्रकाशित करून त्यांनी मराठी सारस्वताला समृद्ध केले. राजवाड्यांबद्दल त्यांचे मित्र प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी सुद्धा एक सुंदर लेख लिहीला आहे. त्यातूनही राजवाड्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. अंगीकारलेल्या कार्यात स्वतःला झोकून देऊन कशाचीही तमा न बाळगता व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता काम करणारे संशोधक आज दुर्मीळ झाले आहेत. आजच्या पिढीने राजवाड्यांपासून प्रेरणा घ्यावी. अजूनही मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक पैलू हे अलक्षित किंवा अप्रकाशित आहेत. अनेक कागदपत्रे संशोधकांची वाट पाहत देशात व परदेशात धूळ खात पडून आहेत. राजवाड्यांचा वारसा चालवण्यासाठी निरपेक्ष ज्ञानसाधना करणाऱ्या संशोधकांची आज नितांत गरज आहे. अशा लेखांमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास वाटतो.
aghaisas
7 वर्षांपूर्वीराजवाड्यांचं व्यक्तिमत्त्व सुंदर रंगवलं आहे. एका वेळी १५० केळी खाल्ली ह्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. परंतु नंतर त्यांची दिनचर्या, विशेषतः त्यातील व्यायामाला दिलेला वेळ पहाता विश्वास ठेवणं भाग पडलं. तसंच त्यांचं तासन् तास काम करणं ही वाखाणण्यासारखं आहे. थोर माणूस. त्रिवार वंदन!