कथा आणि शब्दसंख्या

पुनश्च    विजय पाडळकर    2018-07-28 06:00:18   

अंक- अंतर्नाद; वर्ष- दिवाळी २०१३

लेखाबाबत थोडेसे : पुनश्चवर यावेळी एका अत्यंत वेगळ्या विषयावरचा आणि फारच वेधक असा लेख आहे. जागतिक आणि भारतीय चित्रपटविषयक आस्वादात्मक लेख, स्वतंत्र कथालेखन,  अजरामर जागतिक साहित्यकृती उलगडून दाखवणारे लेखक म्हणून विजय पाडळकर महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांनी आजच्या लेखात लघुकथांचा दीर्घ  आणि अत्यंत रसाळ असा आढावा घेतला आहे. लघुकथा म्हणजे केवढी कथा? तर केवळ सहा शब्दांची कथा! हेमिंग्वेच्या गाजलेल्या सहा शब्दीय कथेपासून तर गुलजार यांच्या सहा शब्दांच्या कथेपर्यंत येताना पाडळकर या छोट्या कथांमधील मोठ्या आशयाची रंजक सफर लेखकाला घडवून आणतात. लेख वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल, सहा शब्दांत एवढं कसं सांगता येतं? पण तीच तर लेखकाची ताकद असते ना!

अंतर्नांदच्या २०१३ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हे लेख तुमच्यासाठी पुनश्च...********

अर्नेस्ट हेमिंग्वेची एक गाजलेली लघुतम कथा आहे. या कथेला नाव नाही. फक्त सहा शब्दांची कथा आहे. ही कथा मुद्रित स्वरूपात त्याच्या एखाद्या कथासंग्रहात मी कोठे वाचली नाही, पण या कथेचे श्रेय हेमिंग्वेला दिले जाते एवढे निश्चित. या कथेच्या संदर्भात असे म्हटले जाते, की उत्तर आफ्रिकेमध्ये हेमिंग्वे एकदा मित्रांसोबत मद्यपान करत बसला असता अत्यंत कमी शब्दांत एक कथा लिहिण्याची पैज त्यांच्यात लागली. त्यावेळी हेमिंग्वेने फक्त सहा शब्दांत आपली कथा सादर केली. असेही म्हटले जाते, की समकालीन लेखकांना आव्हान म्हणून त्याने ही कथा लिहिली. ती कथा अशी होती - ‘For sale : Baby shoes, Never used.’ एके ठिकाणी या कथेची अशीही आवृत्ती आढळते - ‘For ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अंतर्नाद , चिंतन , भाषा , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.