अंक- भवताल, दिवाळी अंक, वर्ष - २०१५ पावसाळा सुरू झाला की माणसाच्या मानसिकतेत काही सूक्ष्म बदल होत असावेत. विशेषतः त्याच्या खाण्यापिण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात. आणि त्या दृष्टीकोनामुळेच त्याच्या जठराग्नीतील तीव्रता वाढत असावी. नाहीतर एरव्ही खाण्यापिण्याकडे लक्ष न देणारे या काळात छोट्या मोठ्या गोष्टींत रस घेतात. पावसाळा माणसांना थोडा मृदु बनवतो, काहीसा काव्यात्मकही. कदाचित नेहमीच्या धावपळीत त्याला जी काहीही न करता बसण्याची उसंत मिळत नाही, ती या काळात मुबलक मिळते. माणूस आदिमानव म्हणून जगत असताना पावसाळा हा त्याच्यासाठी गुहेत काहीही न करता बसण्याचा काळ होता. काहीतरी करत राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्या काळात त्याला चिंतन करण्याचे व्यसन लागले असेल. वादविवाद करण्यासाठी, चित्रं काढण्यासाठी आणि हत्यारं व शिल्पं निर्माण करण्याची प्रेरणा त्याला याच काळात त्यामुळेच मिळाली असेल. आणि त्यातून अनेक काव्य व तत्वज्ञानांचा पाया घातला गेला असेल. आणि अर्थातच याच काळात नेहमीची शिकार आणि फळांचा आहार बाजूला पडून नवीन प्रकारचे खाणे त्याच्या समोर आले असावे. त्यातून त्याच्यातील सृजनशील स्वभावाला, मुख्यतः गरजेतून नवे धुमारे फुटले असावेत. आताही, इतके पावसाळे पाहिल्यानंतरही प्रत्येक पावसाच्या दिवशी खिडकीत नुसते दोन घटका उभे राहिले तरी नेमाड्यांच्या भाषेत 'स्थिती' हो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Girish Phalke
3 वर्षांपूर्वीलेख वाचता येत नाही पूर्ण
[email protected]
5 वर्षांपूर्वीपावसाळ्यात ह्या लेखाची तीव्रतेने आठवण येईल,
Kiran Joshi
7 वर्षांपूर्वीVaa...mast bhuk lagali Vachun!
dhampall
8 वर्षांपूर्वीछान लेख ? पावसात वडापाव खाल्ल्याची एक अत्यंत आनंददायी आठवण ताज़ी झाली.
kiran bhide
8 वर्षांपूर्वीmadam, were u able to read the article?
shubhada.bapat
8 वर्षांपूर्वीata pudhchya pavsalyachi vaat baghu ya
kiran bhide
8 वर्षांपूर्वीतुम्ही पहिला लेख वाचू शकला होतात?
Manisha Kale
8 वर्षांपूर्वीPassword tumhi pathwlela takla tari log in hot nahi aahe