fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हे आमचे अत्रे साहेब

लेखक: दत्तू बांदेकर

‘साहेबां’बद्दल दत्तू बांदेकरांना अपार प्रेम आणि आदर. अत्यंत चावरा-बोचरा विनोद करणाऱ्या बांदेकरांची लेखणी अत्र्यांचं गुणवर्णन करताना ‘पांडुरंगाभेटी पुंडलिक’ अशी भक्तिरसपूर्ण होते. साठीनिमित्त साहेबांवर लिहिलेला बांदेकरी शैलीतीलच पण जरा वेगळा लेख…

********

हे आमचे साहेब आज साठ वर्षांचे झाले. ह्या हिंदुस्थानात साठ वर्षे जिवंत राहणे ही सामान्य गोष्ट नाही. आणि फार लोक तशा फंदांत पडतही नाहीत. कारण ‘साठी बुद्धी नाठी’ ह्या म्हणीचा धसका आणि साठीनंतर येणारा दम्याचा ठसका, ह्यांची अनेकांनी दहशत घेतलेली दिसते. साधारणपणे साठीच्या सुमारास दमा, कटिशूल, पित्तप्रकोप, अर्धांग अशा उपाधींना तोंड द्यावे लागते. पण आमचे वज्रदेही साहेब आधीव्याधींपासून पूर्ण अलिप्त आहेत. साहेबांना खोकताना किंवा डोक्यास अमृतांजन चोळताना मी कधीही पाहिलेले नाही. साहेबांना मच्छर चावला तर मच्छर गतप्राण होईल.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 15 Comments

  1. वाचताना, संवाद होतोय असं वाटतं!

  2. अत्यंत सुंदर। बांदेकरांचे ईतर लेखप्रकाशित करावेत ही विनती।

  3. अत्रे यांचे नवयुग मधील अग्रलेख प्रसिध्द करणे शक्य आहे का?

  4. खूप आवडला… यथार्थ वर्णन…

  5. सुंदर लेख आहे .आचार्य अत्रेंनी देखील दत्तू बांदेकरांवर लेख लिहीले आहेत . ते देखील प्रसिद्ध करावेत .

Leave a Reply

Close Menu