दृष्टीभ्रम तयार करणे हे जादूच्या प्रयोगांचे खास वैशिष्ट्य असते हे लक्षात घेतले तर भारतातील जादूच्या प्रयोगांचा इतिहास महाभारतातील मयसभेपर्यंत मागे जातो. भूतलावरील मर्त्य मानवाच्या मनोरंजनासाठी जादूची दोरी (रोप ट्रिक) फार पूर्वीपासून वापरली जात होती. रस्त्यावर होणारे डोंबाऱ्याचे खेळही बारीक सारीक जादू दाखवत. महाराष्ट्रात साधारण १८८०-९० च्या सुमारास कृष्णनाथ रघुनाथ, गोविंद नारायण यांनी जादूच्या प्रयोगांना व्यावसायिक रुप दिले. त्यानंतर १९०५-६च्या सुमारास काही विदेशी जादुगार भारतात खेळ करुन गेले. पुढे पी.सी. सरकार सारखे श्रेष्ठ जादूगार भारतात झाले. आज तंत्रविज्ञान हाच मोठा चमत्कार झाला आहे आणि त्याने मनोरंजनाच्या शक्यतांची क्षितीजे पार विस्तारली आहेत. परंतु एकेकाळी सर्कस आणि जादूचे प्रयोग हा मोठाच विरंगुळा होता. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या ज्यांनी हाच व्यवसाय केला अशी घराणीही आहेत. अशाच एका घराण्यातील जादुगार चंद्रकांत यांनी जादूचे खेळ सादर करताना आलेले प्रेक्षकांचे अनुभव ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. हा मूळ लेख १९७५ साली 'केसरी'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता- ********** अंक- केसरी ; वर्ष- दिवाळी १९७५तुम्हा गुंतविता आम्ही गुंततो
आमच्या घराण्यात तीन पिढ्यांची जादूची परंपरा आहे. माझे आजोबा मोठे कल्पक, प्रतिभावान व संशोधक बुद्धीचे जादूगार होते. त्यांनी अतोनात परिश्रम करून कित्येक खास प्रयोग बसविले व त्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत: तयार करवून घेतली. जादूसंबंधी वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथसंभार जमविण्याचा त्यांना छंद होता. आपल्या काळात त्यांनी खूप नाव कमविले. माझे वडील तीर्थरूप जादूगार ॲन्टोनी (सीनियर) व माझे दोन्ही चु ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sakul
6 वर्षांपूर्वीजादूच्या प्रयोगाएवढाच आकर्षक आणि मनोरंजक झाला आहे हा लेख. विविध अनुभव नेमक्या शब्दांमध्ये मांडल्यामुळे वाचायला सुरुवात केल्यानंतर थांबवतच नाही. रस्ता लुटू पाहणाऱ्या दरोडेखोरांचा 'जादू'ने केलेल्या बंदोबस्ताचा किस्सा अफलातूनच. वेगळ्या विषयावरचा रंजक लेख.
TINGDU
7 वर्षांपूर्वीस्वानुभव छान सादर केला.
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीवा खूपच वेगळा विषय आहे
Monika
7 वर्षांपूर्वीमस्त लेख. नवीन विषय वाचायला मिळाला.
vrushali
7 वर्षांपूर्वीKhup chan.
arya
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख ...सुंदर मांडणी व चित्रमय शैली आवडला लेख