मराठीत आजवर टोपण नावाने लिहिली गेलेली विनोदी सदरे हा अभ्यासाचा एक खुमासदार विषय आहे. गोमा गणेश हे असेच एक नमुनेदार टोपण नाव. ललित मासिकातले ठणठणपाळ या नावाने लिहिले जात असलेले सदर जयवंत दळवींनी बंद केले. ते त्यांनी पुन्हा सुरु करावे अशी विनंती संपादक करत होतेच,दरम्यान त्यांनी गोमा गणेश यांचे पितळी दरवाजा हे सदर सुरु केले आणि तेही खूप गाजले. हे गोमा गणेश म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक व अर्थतज्ज्ञ सुभाष भेंडे. गोमा गणेशांच्या त्या सदरांतूनच आजचा चुरचुरीत लेख घेतलेला आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या भोवतीचे वलय, दंतकथा आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये १९८७ साली त्यांच्यावर आलेला एक लेख हे निमित्त करुन गोमा गणेश यांनी हा शंभर नंबरी लेख लिहिला होता- रविवार दिनांक १९ जुलै १९८७ हा दिवस तमाम मराठी साहित्य रसिकांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस म्हटला पाहिजे. त्या दिवशीचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ काढून सहावे पान पाहणाऱ्याला ‘अजि म्या ब्रह्म पाहिले...’ असा दिव्य साक्षात्कार झाला असेल! अंगात जोधपुरी कोट, उलटे फिरविलेले केस, डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल आणि जिवणीच्या कडांशी घुटमळणारं स्मितहास्य-कुणाची बरं ही छबी? महत्त्वाचं नाव वाचून आमचा तरी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना... दस्तुरखुद्द गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी.ए.? मुंगीनं मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरविंद गोखल्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तर स्वीकारलं नाही ना? रमेश मंत्र्यांनी ‘भारत यात्रा’ तर थांबविली नाही ना? जयवंत दळवींनी मासळी खाणं सोडून तर दिलं नाही ना? आजपर्यंत प्रसिद्धीच्या झोतापासून अनेक योजने दूर असलेले जी. ए. एकाएकी ‘म.टा.’मध्ये झळकले! जीएंचं दर्शन घेण्यासाठी आजपर्यंत तमाम मंडळींना धारवाडला जावं लागायचं! (वसंत नरहर फेणे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sakul
7 वर्षांपूर्वीझकास! जी. ए. आणि ग्रेस यांच्यापासून आजवर जाणीवपूर्वक दूरच राहिलो. त्या दोघांवर बोलल्याशिवाय 'मर्मग्राही वाचक' असा शिक्का बसत नाही म्हणे! पण इथे कुणा लेकाला शिक्क्याचे पडले आहे. आता चुका काढण्यासाठी तरी या दोघांचे निवांत वाचले पाहिजे. म्हणजे शिक्कामोर्तब होईलच आणि चुका काढण्याचेही शिकता येईल. या लेखातून शेष काही राहिले ते हे!
ulhas
7 वर्षांपूर्वीजी एंची भाषा नसमजण्या एवढी क्लिष्ट नाही. पण विचार जरूर करावा लागतो. सामान्यांना समजणार नही अशा भाषेचा वापर करणे ही समिक्षकांची,ग्रेसची मक्तेदारी!आहो ह्यालाच तर बुध्दी वैभव, विदवत्ता मानतात. सामान्य पामरांनी नुसते तोंड वासून ऐकायच.(वाचून काही उपयोग नाही.)
shashikantsawant
7 वर्षांपूर्वीछान आहे लेख आवडला .
milindKolatkar
7 वर्षांपूर्वीम.टा.तला लेख आहे? कुठे मिळेल? धन्यवाद.
mohinipitke
7 वर्षांपूर्वीअतिशय खुसखुशीत रसारशीत लेख !