जीवन विमा अतिरेक: न करण्याचा आणि करण्याचाही

पुनश्च    उदय कर्वे    2018-10-17 06:00:35   

आयुर्विम्याला पर्याय नाही...या एका वाक्यानं एकेकाळी आपल्या समाजात विम्याची कल्पना रूजवली. तरीही त्यानंतर अनेक वर्ष नाटक-सिनेमात एलआयसी एजंट हा चेष्टेचा विषय होता. बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देण्यातच फार पराक्रम आहे, अशी काहीशी मानसिकता निम्नमध्यमवर्गियांची होती, त्यात गेल्या पाव शतकात हळूहळू बदल झाला. आता तर कशाचाही विमा काढण्याची टूम आली आहे. या परिस्थितीत विमा कुणी काढावा, किती रकमेचा काढावा याबाबत समज कमी आणि गैरसमज जास्त असतात. त्यावर खुसखुशीत भाष्य करत योग्य त्या दिशेला घेऊन जाणारा हा लेख. लेखक स्वतः बँकिंग क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या लेखनात नेमकेपणा आहे आणि आर्थिक विषय वाचकांना सोप्या भाषेत सांगण्याची हातोटीही आहे. “बाळाचे बर्थ सर्टिफिकेट आजच्या आज मिळेल ना?” गायनॉकॉलॉजिस्ट असलेल्या माझ्या मित्राला, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे (प्रथमच बाप झालेले) तरुण वडील विचारत होते. माझ्या डॉक्टर मित्राने विचारले की “कसली विशेष घाई आहे?” त्यावर मुलाचे वडील म्हणाले “अमेरिकेप्रमाणे बाळाचे नाव आजच्या आज इथेच ठरवतोय (व ठेवतोय) त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट मिळाल्यावर आजच्या आजच बाळाची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची ठरवलेय. आय वॉन्ट माय चाइल्ड टू बी इन्शुअर्ड फ्रॉम डे वन!” आता ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची पाळी माझ्या त्या डॉक्टर मित्राची होती. अवाकच झाला होता बिच्चारा! मला म्हणाला, ”रक्षित असे मुलाचे नाव ऐकले होते, ह्यांच्या मुलाचे नाव बहुधा “संरक्षित” ठेवतील.” सध्याची ज्याचा-त्याचा इन्शुरन्स करावा असे वाटणारी प्रवृत्ती हे एक टोक आहे तर दोन-एक पिढ्यांपूर्वी “मला कशाला हवाय इन्शुरन्स? मी पक्‍का ठणठणीत आहे, काढला मोठा विमा आणि नाहीच मेलो, तर गेले ना पैसे फुकट?” अशा थट्टे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्यसंस्कार , अर्थकारण

प्रतिक्रिया

  1. बाळासाहेब खोल्लम

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय योग्य सल्ला देणारा लेख.चाणाक्षपणे विमापाॕलिसी कशाकाढाव्यात याची यथायोग्य जाणिव होते.

  2. shriramclinic

      7 वर्षांपूर्वी

    आर्थिक साक्षरता हा महत्वाचा विषय घरातून शिकवला जावा

  3. AMKHADILKAR

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत उपयोगी असा माहितीपूर्ण लेख

  4. AMKHADILKAR

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत उपयोगी असा माहितीपूर्ण लेख

  5. arush

      7 वर्षांपूर्वी

    एकदम आटोपशीर आणि मुद्देसूद लेख

  6. gadiyarabhay

      7 वर्षांपूर्वी

    फार सुंदर आणि सोप्प्या भाषेत लिहिलंय. मी स्वतः विमा सल्लागार आहे म्हणून अजून लक्षपूर्वक वाचला

  7. Meenal Ogale

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान माहितीपूर्ण लेखन.अशाच प्रकारे आरोग्य विम्यावर लेख वाचायला आवडेल.

  8. Parvraj

      7 वर्षांपूर्वी

    खूप दिवसापासून विमा नक्की कोणाचा आणि कीतिचा उतरवावा हा प्रश्न पडला होता. आज बऱ्याच शंकांचे निरसन झाले.

  9. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    Nice article. Very sensible advice.

  10. ssaptarshi

      7 वर्षांपूर्वी

    खुमासदार शैलीत महत्त्वाचे मुद्दे छान मांडले आहेत !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen