अंक - अक्षर लेखिका - मीनाक्षी शिरोडकर ********** उणेपुरे चोवीस तासच! -पण आज चाळीस वर्षांनंतरही अंगावर शहारा येतो! चोवीस तासांतील अनेक क्षण, त्याआधीचे रुसवे-फुगवे. नंतरची स्तुती, टीकाटिप्पणी अन् माजलेलं वादळ – अशा आठवणींचा तीव्र शहारा! ब्रह्मचारीतलं ते वादग्रस्त स्नानदृश्य...! ‘तुम्हाला स्वीमिंग सूट घालावा लागेल’ विनायकराव मला म्हणाले. माझ्या अंगावर कांटाच उभा राहिला. ते कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील? – छे, छे! असला पोशाख घालून लोकांपुढे उभं राह्यचं? – माझ्या मनात विचार आले, ते हे असे! ‘स्वीमिंग सूट घालून मी पाण्यात उतरणार नाही.’ मी विनायकरावांना साफ शब्दांत सांगून टाकलं. माझ्या या पावित्र्यानंतर ‘हंस’च्या मंडळीत त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. विनायकरावांना तर कोणत्याही परिस्थितीत ते दृश्य हवंच होतं. ते आपला आग्रह सोडायला मुळीच तयार नव्हते. ‘तुम्हाला हा ड्रेस घालून काम करावंच लागेल.’ विनायकरावांनी निग्रहाने सांगितलं. ‘मग मला हा ड्रेस नको अन् तुमचा पिक्चरही नको.’ माझा हा हट्टीपणा पाहाताच विनायकरावांनी मी ‘हंस’शी केलेलं करारपत्रच माझ्यापुढे टाकलं. सिनेमातील दृश्यांत आवश्यक ते कसलेही कपडे मी वापरीन. असं मी स्वतःच लेखी स्वरुपात लिहून दिलं होतं. आता काय करणार? करारात तर अडकून बसले होते. मला तर रडूच कोसळलं. मग विनायकरावांनी मला समजावून सांगितलं. म्हणाले, ‘अहो या दृश्यात तसं काही अश्लिल वगैरे नाही. अन् हे दृश्य, असा पोशाख सिनेमाच्या दृष्टीने आवश्यक आहे.’ ‘या पोशाखात वाईट ते काय आहे? तू कपडे सोडून उभी आहेस की काय?’ अशी अत्रेसाहेबांनी माझी समजूत काढली. बाबुराव पेंढारकरांनीही धीर दिला. त्या आधी ‘ब्रह्मचारी’चा बराचसा भा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वी"यमुनाजळी रंगलेला खेळ" हा मीनाक्षी शिरोडकर ह्यांचा लेख खुप-छान आहे. अगदी प्रामाणिकपणे लिहीलाय. पण लेखाचा काळ कोणता ? कारण अंगप्रदर्शनाबाबत एकट्या झीनत-अमान चा उल्लेख आहे. म्हणजेच माझ्या अंदाजे हा लेख 1975 -- 1978 -- 1980 ह्या दरम्यानचा असावा