अंक- अंतर्नाद
लेखाबद्दल थोडेसे : कवितेसंबंधी लिहिताना प्रसिद्ध साहित्यिक ह.शि. खरात म्हणाले होते, 'कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते तर कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते, कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. पण या सा-यांच्या पलीकडे कविता असते. निराकार परमेश्वरासाखी. अशी सच्ची कविता जर भेटली तर परब्रह्म भेटल्याचा मला आनंद होतो...' कवितेचं साफल्य कशात आहे, याचं गोळीबंद असं उत्तर नाही. केशवसुतांची 'तुतारी', विंदांची 'माझ्या मन बन दगड', मर्ढेकराची 'पिपात मेले ओल्या उंदीर ' किंवा कुसुमाग्रजांची 'कणा'..या सारख्या काही कविता आपल्या सामाजिक-भाषिक व्यवहाराच्या भाग बनल्या. परंतु एखाद्या कवितेनं प्रत्यक्षात एखादं कार्यच घडवलं अशी उदाहरणं दुर्मिळ आहेत....जवळपास नाहीतच. दत्ता हलसगीकरांच्या एका कवितेनं हा चमत्कार करून दाखवला. त्या चमत्काराची ही नवलकथा खुद्द कवीच्याच शब्दांत-
दैनिक सकाळचे माजी कार्यकारी संपादक श्री. अनंत दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचा समारोप माझ्या एका कवितेतील शेवटच्या चार ओळींनी केला होता. तो लेख माझ्या वाचनात आला होता. एके दिवशी ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांचा मला फोन आला. मी चकित झालो. या मासिकात माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या, पण माझी संपादकाची ओळख नव्हती. फोनवरून ते म्हणाले, “सकाळमधील लेखातल्या तुमच्या चार ओळी आवडल्या पण ही पूर्ण कविता फोनवरून सांगा.” मी त्यांना ती कविता सांगितली आणि विचारले, “कशासाठी हवी आहे कविता?” “नंतर कळेल,” एवढंच ते उत्तरले. दोन महिन्यांनी अंतर्नादचा मार्च २००१ महिन्याचा अंक घरी आला. वेष्टन उघडून पाहतो तर .....
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच सुंदर कविता - कवीतेची निर्मिती कथा आणि कवितेला मिळालेला प्रतिसाद आणि कवि चे मनोगत सुद्धा ! अप्रतिम !
SubhashNaik
6 वर्षांपूर्वीदत्ता हलसगीकर यांची सुंदर कविता आणि तितकाच सुंदर लेख. - सुभाष नाईक, पुणे.
SubhashNaik
6 वर्षांपूर्वीकविमित्र दत्ता हलसगीकर यांची सुंदर कविता आणि हा अप्रतिम लेख वाचून मनोमन सुखावलो. डोळे पाणावले. - सुभाष नाईक
Manisha Deshpande
6 वर्षांपूर्वीsundar.