नरेंद्र दाभोलकर आणि सांगली


नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेताक्षणी आपल्याला आठवते ती अंधश्रद्धा  निर्मूलनाची चळवळ आणि दाभोलकरांची आग्रही भूमिका. परंतु दाभोलकरांची लेखणी साहित्य-संस्कृतीच्या प्रांतातही तेवढ्याच सहजतेने मुशाफिरी करत होती आणि त्यांना त्यांच्या परिसराचा, सांगलीचा लालित्यपूर्ण इतिहास आहे याचा सार्थ  अभिमानही होता. कृष्णाकाठी वसलेले हे शहर पटवर्धन राजघराणे, विष्णुदास भावे आणि त्यानंतर अलिकडे वसंतदादा पाटील, पतंगराव कदम अशा नावांमुळेही सतत चर्चेत राहिले. दाभोलकरांनी १९६९ साली लिहिलेल्या या  अत्यंत वेगळ्या लेखात सांगलीच्या साहित्य परंपरेची केलेली उजळणी भूतकाळात तर घेऊन जातेच शिवाय येथील प्रसिद्ध श्री गणेशाने या शहरावर केलेली प्रतिभेची पखरण किती वैविध्यपूर्ण होती याचा प्रत्ययही देते- ********** अंक – ललित, सप्टेंबर, १९६९ साहित्यिक सांगली (मूळ शीर्षक ) सुखकर्ता दुःखहर्ता गजानन हे सांगलीकरांचे कुलदैवत. त्याच्या कृपेने सांगलीचे वैभव अनेक क्षेत्रात बहरले. विद्येचा वरदहस्त असलेल्या मंगलमूर्तीमुळे सांगली साहित्यिक क्षेत्रात सुप्रतिष्ठित झाल्यास नवल नाही. (पण का कोण जाणे, पुण्याम्हमईची मानसं आपल्याला अजून सांगली-सातारकडचे अडाणी पाव्हणंच समजतात, हा सांगलीकरांचा अस्वस्थ करणारा सल आहे खास!) नाट्यपंढरी हा सांगलीचा यथार्थतेने केला जाणारा उल्लेख सांगलीकरांची मान अभिमानाने निश्र्चित ताठ करतो. विष्णुदास भाव्यांनी श्रीमंतांच्या इच्छेवरून आणि कानडी नाटकांवरून कल्पना घेऊन ‘सीता स्वयंवर’ हे आख्यान रसाला अनुकूल कथारूपांतरात अठराशे बेचाळीस साली सादर केले, ती मराठी नाटकाची धूळपाटी. स्त्रीवेष पुरुषांना चालेल हा शास्त्राधार अप्पासाहेब पटवर्धनांनी खास पंडितांच्याक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , ललित , स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    फारच छान ललित!

  2. abcd

      6 वर्षांपूर्वी

    khup sundar lekh...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen