बॅ. बाबासाहेब जयकर यांच्या व्यक्तिमत्त्वांतील छायाप्रकाश

पुनश्च    दा. वि. गोखले    2018-12-08 06:00:34   

बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव उपाख्य बाबासाहेब जयकर हे एक बहुमुखी व्यक्तिमत्व होते. उत्तर आयुष्यात त्यांच्या  प्रयत्नानेच सुरु झालेल्या पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरु. त्याआधी त्यांनी मुंबईत वकील  म्हणून उत्तम यश आणि मुबलक पैसा मिळवला होता. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग न घेताही ते या लढ्यात वैचारिक पातळीवर मोठी भूमिका करत होते. पुढे राजकारणाऐवजी त्यांनी शिक्षणक्षेत्र निवडले कारण त्यांच्या मते राजकारणात अनैतिकत्वाचा चिखल झालेला आहे. त्यांचे हे मत १९५०-५२ च्या सुमारासचे होते, यावरुन आपली राजकीय घसरण किती जुनी आहे ते लक्षात येईल. १९५६ साली ते पुणे विद्यापीठातून निवृत्त झाले तेव्हा दा.वि. गोखले यांनी साधनामध्ये लिहिलेला  हा लेख. गोखले हे त्या काळातील एक ज्येष्ठ आणि चिकित्सक पत्रकार होते. ********** अंक- साधना, २५ फेब्रुवारी १९५६ बॅ. बाबासाहेब जयकर हे लवकरच पुणे विद्यापीठाच्या कारभाराची सूत्रे सोडणार असून आपल्या कुलगुरुच्या अधिकारापासून निवृत्त होत आहेत. त्यांना मिळालेला किंवा त्यांनी मिळवलेल्या पदव्यांची बिरुदावली विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून शोभण्यासारखी आहे. उभा महाराष्ट्र जरी त्यांना ‘बाबासाहेब’ या लाडक्या नावाने संबोधित असला तरी महाराष्ट्राबाहेर त्यांचे, नेक नामदार मुकुंदराव रामराव जयकर, बार अॅट लॉ, एम्.ए., एल्.एल्.डी., डी.सी.एल्., पी.सी., असे वर्णन केले जाते. पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू झाले हे विद्याविभूषितत्वाच्या दृष्टीने उचितच होय; पण याशिवाय या विद्यापीठाचे ते अक्षरशः भाग्यविधाते आहेत. १९२४-२५ साली नेमलेल्या ‘एज्युकेशन रिफॉर्म कमिटी’चे सभासद या नात्याने पुण्याकरिता म्हणजे महाराष्ट्राकरिता विद्यापीठ असावे, असा आग्रह त्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , साधना , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen