शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही साहित्यिकांना, गौरव म्हणून मोठ्या रकमा देण्याचे जाहीर केले होते. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहून त्यास विरोध केला होता आणि त्या रकमेची संभावना 'रमणा' अशी केली होती. पेशवाईच्या काळात लोकप्रिय असलेला हा रमणा म्हणजे नेमका काय प्रकार होता, त्यांची गंमतीशीर हकीकत अ. का. प्रियोळकर यांच्या या लेखात आहे. शिवाय भ्रष्टाचाराला, औद्धत्यालाही जात-धर्म नसतो हेही यातून दिसते. ब्रिटिशांच्या काळातली एक घटना. ब्राह्मणांना मिळणारी मदत एकाने ख्रिश्चन धर्म पत्करल्यावर बंद झाली, तेव्हा त्याने 'ती बंद केली जाऊ नये, कारण ती मदत धर्माला नसून ज्ञानाला आहे', असा दावा केला होता. 'मनुष्य दानाला पात्र होतो तो त्याच्या कर्माने. जन्माने किंवा धर्माने नव्हे'. हे सूत्र सगळ्यांनाच मान्य असते. परंतु तरीही आरक्षण, सवलती, जात, धर्म आणि भ्रष्टाचार हे मुद्दे आज फेसबुक-युगातही वादांचे, चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. प्रस्तुत लेख वाचून आपल्या लक्षात येईल की युगानुयुगे आपण याच चर्चा करत आलो आहोत आणि करत राहणार आहोत. अ.का. प्रियोळकर हे मराठीतले नामवंत संशोधक, समीक्षक. 'डॉ भाऊ दाजी लाड', 'कविवर्य मोरोपंत', 'मुसलमानांची मराठी कविता' आदी आठ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. 'विविधज्ञानविस्तारा'त ते सहसंपादक होते. अरूणोदय बी. ए. या नावाने त्यांनी कविताही लिहिल्या. १९७३ साली त्यांचे निधन झाले. ********** अंक- विविधवृत्त, दिवाळी १९५७ जच्चा बसलो होति नजच्चा होति ब्राह्मणो। कम्मुना बसलो होति कम्मुना होति ब्राह्मणो ति।। भगवान बुद्ध श्रावस्ती येथे आरामात असताना एकेसमयी आग्निक भारद्वाजाने प्रश्न केल्यावरून भ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, समाजकारण
, विविधवृत्त
mbjoshi
6 वर्षांपूर्वीलेख चांगला आहे. रमण्यासंबंधीची माहिती रंजक वाटली. धन्यवाद!