टोपण नावाने विनोदी किंवा टीकात्मक लिखाण करण्याची मराठीत मोठी परंपरा आहे. आलमगीर या नावाने विविधवृत्त या साप्ताहिकात अशा पद्धतीचे राजकीय सामाजिक लिखाण दीर्घकाळ करून चंद्रकांत बावडेकर यांनी मोठाच लौकीक प्राप्त केला होता. त्यांनी अनेक लेखक घडवले. पुढे विविधवृत्त सोडून त्यांनी आलमगीर नावाचे मासिकही काढले. बावडेकरांमध्ये शालेय वयापासूनच बंडखोर वृत्ती, धडाडी, टोकदार लिखाण करण्याची क्षमता होती. १९ जानेवारी १९७६ रोजी त्यांचे निधन झाल्यावर सह्याद्री या साप्ताहिकात दीर्घलेख लिहून हरिभाऊ हर्षे यांनी बावडेकरांचे लिखाण, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आयुष्य यावर उत्तमरित्या भाष्य केले होते-त्यात ते म्हणतात- ‘ आपल्या शंभर शब्दांगणिक एक शब्द या परिमाणांत बोलणारा, लोचनांनी स्मित करणारा आणि खाकी विड्या ओढणारा हा ‘आलमगीर’ रस्त्यांतून वावरतांना अथवा आपल्याशीच एकांतात कधी तरी अब्दुल करीमखांच्या लोकप्रिय ठुमरीची एखादी उत्स्फूर्त गोड लकेर मधूनच वातावरणात सोडून द्यायचा.’ – तोच हा लेख. ********** ‘करायला गेलो एक-’ या आमच्या क्लबतर्फे झालेल्या नाटकांतल्या माझ्या नायकाच्या भूमिकेनं प्रभावित होऊन सर्वश्री बाबूराव कामत आणि एम.पी. मोंडकर (DRI officer) या दोघांनी ‘हरिभाऊ’ असं माझं नामाभिधान केलं, त्यापैकी बाबूराव कामतांचा लेखक म्हणून बावडेकरांच्याबरोबर परिचय झाला होता... कामतसाहेबांच्या प्रकृतीसंबंधी आपुलकीचा जिव्हाळा व्यक्तवून बावडेकरांनी मला लिहिलं होतं... “...मीही ५ मे १९७५ रोजी पहाटे पांच वाजता असंच प्रस्थान ठेवलं होतं व परमेश्वरचिंतन करत तयार राहिलो होतो. पण नंतर डॉक्टरांच्या उपचारानं पुन्हा बरा झालो. डॉक्टर हे धन्वंतरी नसतात अथवा मानव हा अमर नसतो. माझं कार्य मी चांगल्या प्रकारे क ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सह्याद्री
, मराठी नियतकालिक
, मराठी नियतकालिकांचा इतिहास
, व्यक्तिविशेष
, हरीभाऊ हर्षे
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीखूपच मस्त, अत्रे आणि बावडेकर ह्यांच्या त जे वाद झाले ते लिखाण वाचायला मिळालं तर बर होईल