गहकूटं विसङ्गीतं


“Home is a place you grow up wanting to leave, and grow old wanting to get back to.” असं एक इंग्रजी वचन आहे. छोट्यासा गावात, निसर्गाच्या कवेत बालपण घालवताना आपण ऐहिक प्रगतीच्या वाटेनं ते घर, परिसर सोडून जातो. परंतु कालांतरानं त्या प्रगतीची सवय झाली की पुन्हा मनानं त्या परिसरात रेंगाळू लागतो. कमीअधिक प्रमाणात हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. परंतु प्रतिभेचे लेणं लाभलेली व्यक्ती ते ज्या पद्धतीनं, तऱ्हेनं सांगू शकते तसं ते केवळ त्यांनाच शक्य आहे. भावनांचे मौनराग गाऊन मराठी शारदेची वीणा झंकारणाऱ्या महेश एलकुंचवारांनी  वऱ्हाडात पांढरकवड्यानजिक असलेल्या त्यांच्या पारवा या गावातील त्यांचा वाडा आणि परिसर, ते गाव बालपणीच सोडल्यावर सतत मनात बाळगला होता. तब्बल ३८ वर्षांनी ते पुन्हा त्या परिसरात गेले आणि वाडा पाहिला, तेव्हा झालेली त्यांची मनःस्थिती या लेखात त्यांनी शब्दबद्ध केली आहे. परंतु ती मनःस्थिती म्हणजे या शब्दमैफलीतील गाण्याची उत्तुंग अखेर आहे. त्यापूर्वी रागाची भूमिका सांगताना त्यांनी केलेला प्रस्तावनारूपी स्वरविस्तारही तेवढाच वेधक, मोहक आहे. १९९० साली मौजेच्या दिवाळी अंकात आलेला हा लेख म्हटले तर २९ वर्षे जुना आणि म्हटले तर ज्याला जुनेपणाचा कधीही स्पर्शच होणार नाही असा-

अंक- मौज दिवाळी १९९०

लेखक- महेश एलकुंचवार

तुम्ही कुठले असे मला कोणी विचारले की माझी फार विचित्र पंचाईत होते. माझे बालपण दहा ठिकाणी, इथे तिथे असे गेले. काय सांगू? इथे की तिथे की तिथे? मी घुटमळतो व काहीतरी सांगतो किंवा बोलतच नाही, तरी पण आपले आईवडील जिथे असतात जिथे आपले बालपण गेलेले असते तेच आपले गाव व तेच आपले घर असे आपण साधारणतः समजतो आणि त्या गावाशी व घराशी आपले आतडे गुंतलेले असते

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज , दीर्घा , अनुभव कथन , स्थल विशेष

प्रतिक्रिया

 1. Ashwini Gore

    2 महिन्यांपूर्वी

  वाह !!....भावपूर्ण लेख

 2. निर्मोही फडके

    2 महिन्यांपूर्वी

  घराचाआदिबंध. सरांच्या लेखणीतून घराचं असतंपण - नसतंपण मनतळाशी जाऊन रुजलं आणि बुद्धतत्त्वज्ञानाचा व्यापक अवकाश घेऊन साकारलं. धन्यवाद बहुविध.

 3. Vinayak Shembekar

    2 महिन्यांपूर्वी

  किती चित्रमय आठवणी लिहिल्या आहेत!फारच छान!

 4. Sushma Karandikar

    2 महिन्यांपूर्वी

  एक चित्रमय लेखन.. प्रचिती देणारे.

 5. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  किती सुरेख !!!! वाचताना लेखका बरोबर आपण सुद्धा तिथे गेलो... किती ओघवती भाषा... जणू काही आपण च आपल्याशी बोलतोय.... धन्यवाद बहुविध डिजिटल

 6. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  खूपच छान आठवणी, मीही माझे बालपण माझ्या आजोळी गेले त्या गावी पोहोचलो. हा लेख वाचताना लक्षात आले की मीही ते गाव सोडून ३८ वर्षे झाली, नंतर बरेच स्थलांतर झाले, लहान खोलीपासून मोठा ऐसपैस सदनिका झाली पण मन अजूनही आजोळच्या घरीच घुटमळते.

 7. विनायक स. बापट

    2 वर्षांपूर्वी

  डोळ्यासमोर सर्व काही ऊभे राहते

 8. rrajan

    3 वर्षांपूर्वी

  छान

 9. deepa_ajay

    3 वर्षांपूर्वी

  अतिशय सुंदर , खुप मजा आली

 10. purnanand

    3 वर्षांपूर्वी

  ५५ ते ६० वर्षापूर्वीच्या कोकणातील माझ्या छोट्याशा गावातील हळव्या हृद्द्य स्मृती लेखकाने जागृत केल्या. वाचताना सारखे डोळे पाणावत होते. १५० वर्षापूर्वीचे घर ,त्याच्या मोठमोठ्या तुळया ,तिन्हीसांजा लावलेले कंदील, छोटे दिवे, मधेच फिरणारी वटवाघळे, रातकिडे ,म्हटलेल्या परवचा, ओउटकि पर्यंतचे पाढे , जनावरांचा गोठा, हम्बरणारी गुरे वासरे, दुध काढणारी आई हे सर्व आठवले. एकेकाळी जगलेल्या वेगळ्याच विश्वाची सफर लेखकाने घडवून आणली . खूप खूप धन्यवाद.

 11. Shubhada

    3 वर्षांपूर्वी

  माझ्याच विचारांचे आणि अनुभूतींचे शब्दांकन वाटावे, असा लेख. काही सूक्ष्म तपशील वगळता, अनेक अनुभव अगदी हुबेहूब. आजच सकाळी माझ्या आजोळच्या घराचे आणि परिसराचे फोटो भावाने whatsapp वर टाकले आणि संध्याकाळी हा लेख वाचला...पुन्हा त्याच भावना पुन्हा अनुभवल्या...काय योगायोग..!

 12. Smita

    3 वर्षांपूर्वी

  खुप सुंदर लेख ... वाचताना सतत गळ्याशी आवंढा येत होता ...डोळे भरून येत होते ...माझ्याही अशा आठवणी आहेत , वयाच्या ८ व्या वर्षा पर्यंतच्या ...त्या पुन्हा जिवंत झाल्या ... पण एलकुंचवारi सारखे प्रतिभेचे लेणे एखाद्यालाच लाभलेले असते ... शब्दातून त्यांनी अक्षरशः डोळया समोर चित्र उभे केले आहे ...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen