महाराष्ट्राची दगडी शीर

पुनश्च    दुर्गा भागवत    2019-02-16 06:00:51   

अंक - मौज दिवाळी १९५७, नंतर समाविष्ट   ‘भावमुद्रा’  १९६०—मौज प्रकाशन गोविंदाग्रजांनी महाराष्ट्र गीतात 'राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा' अथवा  'सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा' किंवा  'पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा' असे का म्हटले, त्याचे सटीक, अचूक आणि बौद्धिक आनंद देणारे विश्लेषण असे आजच्या लेखाचे वर्णन करता येईल. दुर्गा भागवत यांच्या शैलीचा, ज्ञानाचा आणि सामाजिक,  पौराणिक, ऐतिहासिक संदर्भश्रीमंतीचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख. साठ वर्षांनंतरही तेवढाच बोलका आणि खरा.

**********

महाराष्ट्राचा कणा सह्याद्री. काळाकभिन्न. कुठे कुठे म्हणून याला दुसऱ्या रंगाचा स्पर्श नाहीच.ठिकठिकाणी तुटलेले कडे तर अगदी उघडेबोडके.काही सुळके तर आकाशात असे निमुळते उंच गेलेले आहेत की उडते पाखरूसुद्धा त्यांच्यावर बसायला धजायचे नाही,असा त्यांचा धाक. ऊन वर पडेल. वारा त्यांना झोंबेल. पर्जन्य अंगावरून घसरून फेसाळून खाली उतरेल.असा त्यांचा न्यारा थाट. पर्जन्यकाळी कधी हिरवी शेवाळ त्यांच्या अंगावर उमटेल तेवढीच. बाकी मूठभर गवतही रुजायचे नाही. सारे धगधगीत. कडकडीत व्रतच त्या डोंगराचे.पायथ्याशी नद्या वाहतील, त्याही कधी जास्ती लडिवाळपणा करीत रेंगाळायच्या नाहीत. झपाटल्यागत धावतील.जन्मजातच महाराष्ट्राचा हा डोंगरी निसर्ग काही तरी अज्ञात कठोर कर्तव्य घेऊन आलेला आहे जसा. युगे झाली तरी सह्याद्रीचे हे सुळके व त्यांच्यावरचे ते हंगामी पाझर त्या विश्वनियतीच्या पायी आपले व्यक्तित्व होमीत आल्यासारखे वाटतात. अध्येमध्ये हिरवे रम्यपण आहे; पाखरांची आर्त किलबिल आहे ; वन्यपशूंचा अमर्याद जीवनोत्साह आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , मौज , ललित , स्थल विशेष
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर, वास्तविक मागोवा

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    अतिउत्तम !

  3. Asmita Phadke

      3 वर्षांपूर्वी

    दुर्गाबाईंना सादर वंदन 🙏🙏🙏🙏

  4. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान. निसर्ग आणि मराठी माणूस याची ही अलवार गुंफण.

  5. Deepali Datar

      3 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख वाचायला मिळाला. दुर्मिंळ व सकस साहित्य इथे वाचायला मिळते नेहमी. मनापासून धन्यावाद .

  6. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या लेखाचे पुनश्च वाचन केले. अभिमानाने छाती भरून घेतली. जय महाराष्ट्र!

  7. Vinayak Shembekar

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय सुरेख लेख!

  8. Aparna Ranade

      3 वर्षांपूर्वी

    सुंदरच लेख,अगदी वास्तवता दर्शवणारा

  9. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अतीसुंदर लेख

  10. Seema Joshi

      3 वर्षांपूर्वी

    फारच सुरेख लेख

  11. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    मराठी माणंसाचे समर्पक वर्णन

  12. sumansons

      6 वर्षांपूर्वी

    दुर्गा भागवत यांच्या लेखाचे परिक्षण करण्याचा प्रश्न च नाही त्या पात्रतेचे समिक्षक आज नाहीत. प्रश्न लेख निवडीचा आहे. ती उत्तम.

  13. ShubhadaChaukar

      6 वर्षांपूर्वी

    तोलून मापून वागणाऱ्या अभिमानी, मध्यममार्गी, स्थितीप्रिय मराठी मानसाचे यथार्थ चित्रण।

  14. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    होमून म्हणजे होम करून. व्यक्तित्वाचा होम करून. होम करणे म्हणजे पूर्णपणे त्याग करणे, सोडून देणे. या संयुक्त क्रियापदाऐवजी बाई होमणे असे क्रियापद वापरतात. त्यांची शैली असे प्रयोग करते. याच लेखात त्यांनी वर्ज्य करणे, वगळणे याऐवजी वर्जणे-- वर्जून असे म्हटले आहे. ही त्यांची लकब.

  15. ArunBhandare

      6 वर्षांपूर्वी

    होमून शब्द लेखात बर्याच वेळा आला आहे.त्याचा अर्थ कळला नाही लेख वाचनीय.

  16. scd9265

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख!

  17. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    मराठी माणसाच्या मानसिकतेचा मागोवा बाईंनी छान घेतला आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen