प्रिय श्रीभाऊ,


अंक- महाराष्ट्र टाईम्स दिवाळी, १९९७ समांतर (मूळ शीर्षक) लेखाबद्दल थोडेसे : कुटुंबव्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं  खास वैशिष्ट्य आहे.  कुटुंबातील सदस्यांना एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आपुलकी वाटणं हे तर वैश्विक आहे, परंतु वडील-मुलगा, मोठा भाऊ-धाकटा भाऊ, आई-मुलगी, वडील-मुलगी, पती-पत्नी अशा विविध नात्यांमध्ये सामाजिक, कौटुंबिक संकेतांचे जे पदर भारतीय मूल्यव्यवस्थेत आढळतात ते जगात कुठेही आढळणार नाहीत.  या संकेतांपुढे, अपेक्षांपुढे  आणि जबाबदाऱ्यांपुढे व्यक्तिस्वातंत्र्य नेहमीच दुय्यम ठरत आले आहे, आणि त्याची आपल्याला खंतही नसते. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी आपले ज्येष्ठ बंधू श्री.ग. माजगावकर यांना त्यांच्या निधनानंतर लिहिलेले हे अनावृत पत्र वाचताना या नातेसंबंधातील घुसमट आणि आदर ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्याला तोड नाही.  त्या अर्थाने हा लेख म्हणजे मराठी साहित्यातील एक अपूर्व लेणे आहे. श्री. ग. माजगावकर यांच्या निधनानंतर १९९७ साली महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात एका लेखाच्या रूपात हे पत्र प्रसिद्ध झाले होते. आधी पाक्षिक आणि पुढे साप्ताहिकात रूपांतर झालेल्या 'माणूस' ला आकार देणारे श्रीगमा यांचा प्रवास आणि धाकटे बंधू दिगमा यांचा त्यांना सहाय्यक म्हणून सुरू होऊन 'राजहंस' पर्यंत झालेला प्रवास या समांतर वाटचालीचा हा देखणा आलेख आहे- ********** श्रीभाऊ, सप्रेम नमस्कार, तुझ्यासंबंधी विचार करताना मनात पहिली आठवण कोणती आली सांगू? पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरून तुझा हात धरून मी चाललो आहे. संध्याकाळची पाच-साडेपाचची वेळ आहे. कुंटे चौकाजवळच्या एका दुकानात तू मला घेऊन जातोस आणि मोठ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिक , महाराष्ट्र टाईम्स , भाषा , व्यक्ती विशेष , मृत्यूलेख

प्रतिक्रिया

  1. sakul

      6 वर्षांपूर्वी

    फेसबुक' आणि 'व्हॉट्सअॅप' नसेल, तर आजची पिढी जेवढी अस्वस्थ होईल, तेवढाच अस्वस्थ मी त्या काळी होत असे - 'माणूस' आणि 'सोबत' यांचे अंक वेळेवर पाहायला मिळाले नाहीत तर! संपादक म्हणून श्री. ग. माजगावकर निःसंशय श्रेष्ठ होते. या माणसाबद्दल त्यांच्या सख्ख्या पाठच्या भावाने लिहिलेला हा लेख हृद्य असाच आहे. त्यात ताण आहे, तणाव आहे, (व्यक्त न केलेलं) प्रेम आहे, आपुलकी आहे आणि नात्याची असोशीही. या दोन भावंडांमध्ये ताण आहे, याची कल्पना कळता वाचक झाल्यानंतर आणि अर्थातच 'माणूस' बंद पडल्यानंतर आली. त्या संदर्भात मध्यंतरी मी एका वरिष्ठ सहकाऱ्याशी बोललो होतो. फाजील कुतुहल म्हणून नव्हे, तर आपल्याला आलेली शंका बरोबर आहे की चूक, एवढे जाणून घेण्यासाठी. त्यांनी त्रोटक उत्तर दिलं नि त्यातून तो अंदाज खरा ठरला. असो! नात्यानं वडीलभाऊ असलेल्या आणि कुटुंबाचा कर्ता बनलेल्या भावाला श्री. दिलीप माजगावकर यांनी लिहिलेलं हे पत्र अस्वस्थ करतं. त्यातून बरंच काही कळतं - अस्वस्थता, कुचंबणा, शब्दांमध्ये मांडता न आलेलं प्रेम असं खूप काही. जाता जाता लेखातल्या दोन मुद्द्यांविषयी - >मला विचारशील, तर १९६६ ते १९७२ हा सहा वर्षांचा काळ हा तुझ्या ऐन कर्तृत्वाचा आणि ‘माणूस’च्या उत्कर्षाचा काळ सांगावा लागेल.त्या आनंदात तू तेंडुलकरांना नेहमीपेक्षा अधिक रकमेचा चेक व अभिनंदनाचं पत्र पाठवलंस. तेंडुलकरांनी चेक परत पाठवला आणि लिहिलं –‘याची आवश्यकता नाही. घाईगर्दीत हातून लिहून झालं, सर्वांना आवडलं, यात समाधान आहे.’ पुढे काही दिवस येणाऱ्या काही जवळच्या लेखक-मित्रांना हे पत्र तू कौतुकानं दाखवायचास.< संपादक आणि लेखक यांचं थोरपण सांगून जाणारं हे उदाहरण आहे. आता बहुसंख्य माध्यमांना फुकटात छापण्यासाठी हवं असतं. संपादक शक्यतो पैसे देत नाहीत आणि चुकून कोणी जास्त पैसे देणार असेल, तर लेखक ते सोडणार नाही. अशा वर्तमानात तेंडुलकर आणि माजगावकर, दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठच ठरले!

  2. chandrashekhar

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम. मनाची एवढी तरलता असुन देखील भावनांची तरलता दोन्ही बंधुना जिवंतपणी एकमेकांच्या समोर मांडता आली नाही हा केव्हढा मोठा दैवदुर्विलास. अशी जर ती वेळोवेळी मांडताआली असति तर ?

  3. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    लेखकाचे त्याच्या मोठया भावासंबंधित आदर, प्रेम, नात्यातील घुसमट इत्यादी भावभावनांचा उत्कट आविष्कार लेखातुन काळजाला भीडतो. मोठ्या भावाकडून व्यवसाय मधील नीतिमत्ता अधोरेखित होते. वडील भाऊ असूनही त्यांच्यातील विचार किंवा मन मोकळे न केल्याची खंत लेखकाला जाणवते. अप्रतिम लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen