झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे अख्ख्या भारताचा अभिमान. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात तिने इंग्रजांना दिलेल्या लढ्याची कहाणी प्रत्येक भारतीयाच्या जिभेवर असते. परवा रिलीज झालेला कंगना राणावतचा मनिकर्निका थिएटर मध्ये तुफान गर्दी खेचतोय. “बुंदेले हर बोलो के मुँह हम ने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी…” पेशव्यांचे कारकून मोरोपंत तांब्याची मनिकर्निका झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत नेवाळकरांशी लग्न करून राणी लक्ष्मीबाई होते. आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू, आपल्या पतीचा मृत्यू पचवते. पतीच्या माघारी आपल्या दत्तक मुलाला राजगादीवर स्वतः राज्यकारभार हाती घेते. ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी दत्तकविधान रद्द करून झाशी संस्थान खालसा करतो. आणि या अन्यायाविरुद्ध आपल्या हक्कासाठी झाशीची राणी मदमस्त ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा पुकारते. दत्तक मुलाला घोड्यावर आपल्या पाठीशी घेऊन ती स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरते आणि लढता लढता ग्वाल्हेरच्या रणांगणावर तिला वीरमरण प्राप्त होत. झाशीची राणी म्हटल की लष्करी पोशाखात हातात समशेर पाठीवर बाळ घेऊन अश्वरोहिनी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तिचे अनेक पुतळे सुद्धा असेच आहेत. तिच्या पाठीवर असणाऱ्या त्या बाळाचं पुढ काय झालं ? याच मुलाच्या हक्कासाठी राणीने आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्याचं पुढ काय झालं याची उत्सुकता सगळ्यानाच असते. झाशीचे राजे गंगाधरपंतानी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला आनंदरावला दत्तक घेतले आणि त्याच नामकरण केलं दामोदरराव. त्याचा जन्म १८४९साली झाला होता. झाशीच्या राणीच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी तो आठ नऊ वर्षाचा असावा. ग्वाल्हेरच्या लढाईत राणील ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीही माहिती नवीन आहे .
Dipikashelar
6 वर्षांपूर्वीKhuup chhan
vrudeepak
6 वर्षांपूर्वीदामोदररावांच्या सांगोपनासाठी एका इंग्रज लश्करी अधिकाऱ्याने बरेच कष्ट घेतले होते असं एकदा अमृत दिवाळी अंकात वाचायला मिळाले होते. त्याविषयी अधिक माहिती लेखात यायला हवी होती असं वाटतं.
manisha.kale
6 वर्षांपूर्वीनेहमीच प्रसिद्ध अशा लोकांचा इतिहासातील कार्य, महती समजते पण मागे राहिलेल्या लोकांचे काय झाले या विषयी एक कुतूहल असते. ते या लेखातुन कळले. छान आहे लेख. आताच आनंदी गोपाळ सिनेमा पाहिला. त्यामध्ये सुद्धा गोपाळराव यांच्या पहिल्या मुलाचे नंतर काय झाले ही एक उत्सुकता लागून राहिली आहे. असो.
arush
6 वर्षांपूर्वीझाशीच्या राणीच्या प्रभावापुढे मुलाचा कधी विचारच केला नव्हता. खूपच नवी माहिती आहे ही
abcd
6 वर्षांपूर्वीखूप छान