चित्रपटसृष्टीतील माझे स्नेह-संबंध

दुर्गाबाई खोटे म्हणजे घरंदाज, राजसी सौदर्याचा पुतळाच जणू. राजघराण्यातील अधिकारी स्त्री असावी तर अशीच, असे त्यांना पाहिल्यावर वाटते. मूकपटांपासून सुरु झालेला त्यांचा अभिनयप्रवास नायिका ते चरित्रअभिनेत्री असा प्रदीर्घ आहे. संपूर्ण कारकीर्दीत त्यांचे नाव कधीही कोणत्याही गॉसिपशी जोडले गेले नाही हे विशेष, म्हणूनच या लेखाचे एक वेगळे महत्त्व आहे. चित्रपटसृष्टील स्त्री-पुरुष संबंध आणि नातेसंबंध हा बाहेरील जगासाठी कुतुहलाचा, काहिसा हलकेपणी पाहण्याचा  आणि चघळण्याचा विषय असतो. या संबंधीचे समज,गैरसमज, वस्तूस्थिती आणि स्थिती यासंबंधी दुर्गाबाईंनी १९८१ साली दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख आहे. काळ बदलला, समाजात  तुलनेने अधिक मोकळेपणा आला तरीही चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन तोच आहे, त्यामुळेच हा लेख आजही तंतोतंत लागू पडतो-

*******************

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलावंतांच्या जीवनाबद्दल आम जनतेत फार मोठे कुतूहल असते. त्यातही विशेषत: मित्र-मैत्रिणींच्या स्नेहसंबंधांबद्दल अधिक कुतूहल असते आणि ते स्वाभाविक आहे! रूपेरी पडद्यावर दिसणारे, वावरणारे कलावंत-स्त्रिया आणि पुरुष- त्यांचे पडद्यावर दिसणारे प्रणय… त्यांच्यावर ओढवणारे सुखदु:खाचे प्रसंग त्यांच्याबाबतीत घडणारे चमत्कार हे सर्व पाहून सर्वसामान्य प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. पडद्यावर दिसणारे हे सर्व प्रसंग, त्या कलावंतांचे,स्त्री-पुरुष कलावंतांचे वैयक्तिक जीवन, खासगी जीवन यांचा एकमेकांशी कसा आणि कितपत संबंध असेल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतो. त्या प्रश्नामुळेच प्रेक्षकांच्या डोक्यात तर्कवितर्क चालू असतात.

परंतु जे पडद्यावर दिसते ते सारे यांत्रिक, तांत्रिक गणित असते हे प्रेक्षकांना समजणे कठीण! कॅमेऱ्याचे शॉट संपताच स्त्री-पुरुष कलावंतांचे चेहरे निरखण्यासारखे असतात. ते कंटाळलेले, त्रासलेले, घामाने डबडबलेले असतात. बहुतेक जण आपापल्या चेहऱ्यावर कृत्रिम हास्याचा एक मुखवटा कायमचा चढवून ठेवतात. असा मुखवटा ठेवून हिंडणे, फिरणे, आपली प्रतिमा टिकवणे म्हणजे काय दिव्य असते ते फक्त कलावंतच जाणू शकतो. ते कुणाला सांगून कळणार नाही!

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. I don’t know what is problem but I am not able to write Marathi script on your site. Still I will try.
    लेख सुंदर होता. त्यांनि सांगितलेलि व्यक्तिमत्व परिचितअाहेत. त्यामुळे त्यांनि दिलेल्या माहितिनेआपले समाधान होते.

  2. सहज सुंदर लेख खूप आवडला

  3. अनेक अकृत्रिम सोज्वळ नाती ती देखील या रंगीबेरंगी दुनियेतली वाचायला मिळाली.

  4. अनुभव कथन मस्त आपल्याला माहिती नसतातचगोष्टी खूप वेगवेगळ्या आसतात छान वाटलं

Leave a Reply

Close Menu