दुसरे पर्व

पुनश्च    य. दि. फडके    2019-03-08 06:00:04   

सत्यशोधक चळवळीचा साधार व सविस्तर इतिहास अद्याप लिहिला गेला नसल्यामुळे महात्मा जोतीराव फुल्यांच्या मृत्यूनंतर (२७ नोव्हेंबर १८९०) तीस वर्षांनी शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने व साहाय्याने ‘ब्राह्मणेतर संघ’ या संघटित राजकीय पक्षाची स्थापना (१२ डिसेंबर १९२०) होईपर्यंतच्या कालखंडातील सत्यशोधकांच्या चळवळीबद्दल आज कोणास फारशी माहिती असल्याचे दिसत नाही. सत्यशोधक चळवळीच्या इतिहासातील या जवळजवळ अज्ञात कालखंडावर डॉ. गेल ऑमवेत यांनी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. हा अपवाद वगळला तर आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील या कालखंडाकडे अन्य अभ्यासकांचे अजून लक्ष गेलेले दिसत नाही. या कालखंडाच्या अभ्यासास उपयुक्त ठरतील अशी साधने धुंडाळल्यानंतर आजवर जी माहिती हाती लागली, तिच्या सहाय्याने सत्यशोधक चळवळीतील चढउतार, ताणतणाव, नेत्यांची धोरणे व डावपेच, त्यांचे वैचारिक व व्यक्तिगत मतभेद, त्यामुळे व बाह्य परिस्थितीमुळे सत्यशोधक चळवळीच्या मार्गात आलेल्या अडचणी व आपत्ती यांचे, अपुरे का होईना, चित्र रेखाटणे शक्य आहे असे वाटते. अंक- मौज दिवाळी १९७९ सत्यशोधक समाजाचे संस्थापक असलेल्या जोतीराव फुले यांनाच त्यांच्या अखेरच्या वर्षांत ‘सत्यशोधक’ हे समाजाचे नाव बदलण्याची आवश्यकता वाटत होती अशी, त्यांचे एक निकटचे सहकारी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांची साक्ष आढळतेः “आपल्या समाजास सत्यधर्म समाज असे नाव द्यावे असे त्यांनी मनात आणिले.” पण लवकरच जोतीराव कालवश झाल्यामुळे हे नामांतर घडून आले नाही, असे अय्यावारूंनी सांगितलेल्या हकीकतीवरून दिसते. खुद्द अय्यावारूंनाही सत्यशोधक समाज हा “नवीन धर्म नव्हे” असे वाटत असल्याने “सत्य समाज हे साधे नाव जास्त सोईस्कर होईल.” असे वाटत असे. जो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , समाजकारण , मौज , दीर्घा

प्रतिक्रिया

  1. CDKavathekar

      3 वर्षांपूर्वी

    सत्यशोधक चळवळी चे Brahmin- Brahmin इतर वादात रुपांतर झाले .हीच त्या चळवळीची खरी शोकांतिका.

  2. hpkher

      3 वर्षांपूर्वी

    ह्यातली खूपशी माहिती नव्हती, लेख पुन्हा प्रकाशात आणल्या बद्दल धन्यवादवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen