पडद्याच्या चालीनं स्त्रीवरील अन्यायविषयक हजारो लेखांना आजवर जन्म दिला आहेत. तर याच पडदा पद्धतीमुळे 'रुखसे जरा नकाब हटा दो' पासून तर 'पर्दा है पर्दा ' पर्यंत असंख्य रोमँटिक गाणीही शायरांनी लिहिली. पुरुषांनी स्त्री जातीवर बंधनं लादून तिला दिलेली ही कैद आहे की सौंदर्याला पडद्यात बंदिस्त करुन स्त्रीनं पुरुषांच्या आशिक नजरांपासून मिळवलेलं ते संरक्षण आहे? लेखकानं या लेखांत याशिवायही काही कारण सांगितली आहेत, ज्यांचा आपण एरवी कधी विचारही केला नसेल. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता. भूकंपानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी, घराघरात जाऊन त्या कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांचे नेमके नुकसान किती झाले, याची खातरजमा जमा करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यात स. वा. इनामदार हे मराठी अधिकारीही होते. त्यांना बिहारमध्ये गेल्यावर पडदापद्धतीची वेगळीच गंमतीदार कारणं शोधून काढली त्याची ही रंजक हकीकत आहे. ८३ वर्षांनीही तरोताजा वाटणारा हा लेख- ********** (अंक- 'स्त्री' मार्च १९३६) मूळ शीर्षक- बिहार-स्त्रिया-पडदा पडद्याच्या चालीमुळे स्त्रियांचेच नुकसान झाले असे नव्हे, तर पुरुषही भित्रे आणि लाजाळू झाले. शिळ्याच, म्हणजे बिहार भूकंपात ऐकलेल्या-पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी! दुसरी त्यासारखीच गोष्ट बाहेर आल्यावर अगर पडल्यावर पहिल्यास ‘शिळ्या’शिवाय दुसरे विशेष तरी काय लावणार? क्वेट्टा येथील भूकंपाने बिहारचा भूकंप शिळा ठरविला व हा क्वेट्याचाही भूकंप शिळा ठरणार नाही हे तरी कोणी सांगावे? शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणण्यात काही शहाणपणा असतो अशातला प्रकार नाही; पण विषयाच्या महत्त्वाकडे पाहून तसे करण्याकडे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
समाजकारण
, स्त्री
, पुनश्च
, स. वा. इनामदार
swatee
6 वर्षांपूर्वी1936 मधला लेख आहे. आज 80 वर्षे लोटली तरी पडदा संस्कृतीत फारसा फरक पडलेला दिसत नाही.
asiatic
6 वर्षांपूर्वीछान . नर्मविनोदी रीतीने वास्तवदर्शन घडते.
rambhide
6 वर्षांपूर्वी१)ओरडा पडद्याच्या सक्तीविरुद्ध, लादलेल्या रुढीविरुद्ध आहे. २) जर पडदा धूळ व डासांकरिता असेल तर काळाच का? ३)बिहार मधील खेड्यातील परिस्थिती आजही तशीच आहे.
Apjavkhedkar
6 वर्षांपूर्वीलेख फार मजेशिर वाटला.