"I am very glad at this point of my life!' असं हे 86 वर्षांचे 'आनंदराव देशमुख' नावाचे आजोबा म्हणाले! मागच्या आठवड्यात 'एक तासापेक्षा जास्त मी थांबणार नाही' या बोलीवर आईबाबांसोबत कसल्यातरी पुजेसाठी माकेगावला गेलो होतो. तिथं मंदिराजवळ काही म्हातारी मंडळी गप्पा ठोकत बसली होती. त्यात यांनी एवढे व्यसनं करून पण अजुन जीवंत आहेत याचं कौतुक चालु होतं. मी आपलं टाइमपास करावा म्हणून त्यांच्यात जाऊन बसलो.( गप्पा ठोकायला आपल्याला वय matter करत नाही) मग थोड्या गप्पा मारल्यावर लक्षात आलं की वरवर अशिक्षित दिसणारा हा म्हातारा 1960 सालचा पोस्ट ग्रेजुएट होता. मग आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की माझ्या एक तासाचे पाच तास कधी झाले तेच कळालं नाही. आमच्या गप्पात त्यांनी त्याचं अतरंगी आयुष्यच मांडलं. मग त्यात त्यांनी दासबोधातले समास,तुकारामांचे अभंग ते गालिबची शायरी ते शेक्सपियर, जॉर्ज बर्नाड शॉ चे quote ते कुराणातील आयत ते मार्क्स, लेनिनचं तत्वज्ञान त्यातील त्रुटी ते सावरकर आणि संघाचं हिंदुत्व यातला फरक असा आडवातिडवा प्रवासही झाला. अर्थात बऱ्याच गोष्टी डोक्यावरूनही गेल्या पण मी मात्र मंत्रमुग्ध होवून ऐकत होतो. हे शिक्षक आणि बोर्डाचे पेपर सेटरही होते आणि त्यांच्या काळात त्यांनी निकालात कशी वाढ केली आणि पोरांची गुणवत्ता कशी वाढली हे सांगताना रात्रीच्या अतिरिक्त तासाची फी म्हणजे 'दारुची बाटली' हेही त्यांनी हसत हसत सांगितलं. त्यांच्या व्यसनाच्या करियरमध्ये त्यांनी सकाळी एक छटाक गांजा आणि संध्याकाळी एक छटाक गांजा हा रोजचा खुराक होता याचाही उल्लेख करताना त्यांच्या रोजच्या त्या बैठकीतला एकही आज शिल्लक नाही हे पण तेवढच हसून सांगितलं. मग यामुळे एकदा खुप आजारी पडल्यावर एका क्षणात सगळ कसं सुटलं ह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
mani
6 वर्षांपूर्वीछान
sakul
6 वर्षांपूर्वीआनंदराव देशमुख यांच्याशी लेखकानं मारलेल्या गप्पा मस्त मजेशीर आहेत. 'राजकारणात शिकलेली माणसं हवी' असं विधान सरसकट केलं जातं. साठ वर्षांपूर्वी पदव्युत्तर पदवी मिळविलेले देशमुख मात्र राजकारणातून फेकले गेले. अर्थात त्यांनी स्वतःच तसं होऊ दिलं, हे त्यांच्या बोलण्यावरून समजतं. त्यांच्याहून जास्त शिकलेली माणसंही त्या काळात राजकारणात होती आणि ती तिथं स्थिरावली, जम राखून बसली, हेही खरंच आहे. 'असला विचार केला असता, तर...' हे त्यांचं विधान 'झालं गेलं त्याच्यावर माथेफोड नको' हे जगण्याचं साधं तत्त्वज्ञान सांगून जातं. या गप्पा अजून थोड्या जास्त असत्या, तरी वाचायला आवडल्या असत्या. अनुभवाची भरभक्कम शिदोरी सोबत असलेल्या अशा माणसांशी बोलण्यात मजा येते. माजी मंत्री श्री. बी. जे. खताळ पाटील यांच्याशी गेल्या पाच वर्षांत दोन वेळा अशा गप्पा रंगल्या. आता या महिन्यात ते वयाचं शतक पूर्ण करतील.
amarsukruta
6 वर्षांपूर्वीवाह कमाल आहेत हे आजोबा