मराठीत भांडी, फळे, भाज्या, वस्तु, गावाची नावे, झाडांची नावे यावरून काही शिव्या आल्यात.. टवळी ही देखील त्यातलीच एक. पुर्वी देवघरात दिवटी असायची अन शेजघरात टवळी असायची. हे दिव्यांचे प्रकार आहेत. देवघरातली दिवटी एका जागी असायची पण शेजघरातली टवळी हवी तशी फिरवली जायची घरभर. त्यामुळे अति हिंडफीरेगीरी करणाऱ्या स्त्रीला "टवळी" म्हणू लागले. तर घरकोंबड्या बाईला दिवटी. जी माजघर ओलांडून ओटीतही येत नाही ती दिवटी. गावभर हिंडते ती टवळी. दिवटा नावाची कुठली वस्तुच अस्तित्वात नाही, तरीही दिवटी वरून दिवटा आला. वास्तविक दिवटी नाजुक शेलाटी असते. म्हणून आडदांड बिनकाम्या पुरुषाला दिवटा शिवी दिली जाते. वंशाचा दिवा या अर्थाने दिवटा शब्द या शिवीत वापरला जातो. ही कुमार, किशोर ते तरुण वयापर्यंतच दिली जाते. काही ठिकाणी चुडीला किंवा मशालीला दिवटा म्हणायची पध्दत आहे. पण तो अपवादच. मात्र टवळी आहे आणि टवळा ही आहे. टवळा हा वेटोळ्याचा दिवा. त्याची वात भली मोठी असते. ती पेटवता पेटवता नाकी नऊ येतात. वेळ लागतो. एखादे काम करुन ऊशीरा परतलेल्या माणसाला उद्देशून "आला टवळ्याला वात लावून" असे म्हटले जाते. जाताजाता आणखी एक..... प्रकाश देणाऱ्या जेवढ्या वस्तु आहेत त्या ९०% स्त्रीलिंगी आहेत-पणती, चिमणी, मशाल, चुड, बत्ती, समई वगैरे.. टेंभा, पलिता, भुत्या, जेवर, कंदील, बोळा, टवळा, हिल्लाळ ही दिव्यातली पुरुष मंडळी... ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arush
6 वर्षांपूर्वीमजेदार माहिती
purnanand
6 वर्षांपूर्वीव्वा ! खूपच सुंदर माहिती .निरांजन, पंचारती, लामण दिवा, इ. चा उल्लेख (समई चा केलाय म्हणून ) पण चालला असता.
Sanejj
6 वर्षांपूर्वीछान माहिती. धन्यवाद
Namrata
6 वर्षांपूर्वीवा, मस्तच. खूपच छान माहिती मिळाली. उत्तम लेख