श्री रामरक्षा स्तोत्र

पुनश्च    स. कृ. देवधर    2019-04-12 06:00:26   

आज श्रीराम नवमी. प्रभू रामचंद्राची गाथा हा भारतीय महाकाव्यातील एक लखलखता अलंकार तर आहेच शिवाय हिंदूंच्या श्रद्धेचाही एक अविभाज्य भाग आहे.  स्नान झाल्यावर प्रथम रामरक्षा स्तोत्र म्हणून दिवसाला सामोर जाणारांची संख्या मोठी आहे. रामरक्षा म्हणजे काय, ती कशी सिद्ध करावी याचे विवेचन करणारा हा स. कृ. देवधर यांचा लेख- 

अंक – प्रसाद : श्रीराम विशेषांक – ऑगस्ट १९८०

महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामचरित्राची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमली. तीनही भुवनांत तेव्हा सर्व देव, दानव आणि मनुष्य एकत्र जमले. त्यांनी रामचरित्राची वाटणी करण्याचे ठरविले. तिघांनीही त्याला संमती दिली. पण याची वाटणी बरोबर झाली पाहिजे आणि ती करणारा निःस्वार्थी असला पाहिजे. असा कोणी असला तरच ही वाटणी बरोबर होईल. सर्व देव, दानव आणि माणसे अपेक्षावान्. अपवाद होत तो फक्त एका शिवांचा. दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या, स्मशानी वास करणाऱ्या आणि अंगी विभूतीचे मण्डन मिरविणाऱ्या शिवांना मात्र यांच्या वाटणीत काहीच हेतू नव्हता. त्यांनी या कृतीस मान्यता दिली. तरी पण एक अट शिवांनी सर्वांना घातली. ती अट म्हणजे संपूर्ण रामकथा वाटून त्याचा जो भाग आता वाटता येणार नाही, याचे आता काय करावयाचे असा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा उर्वरित शिवांना देऊन टाकायचे. शिवांनी घातलेल्या अटी सर्वांना मान्य झाल्या. शिव एका उच्चासनावर बसले. त्यांच्यासमोर शतकोटी रामायणाची पाने ठेविली. त्यांच्यासमोर देव, शिवांच्या उजव्या हाताला मानव आणि डाव्या हाताला दानव गर्दी करून बसले. शिवांनी पवित्र प्रणवाचा उच्चार केला आणि पोथीचे पान उचलले. पहिले पान मानवांना दिले. दुसरे दानवांना आणि तिसरे देवांना. याप्रमाणे वाटप सुरू झाले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रसाद , दीर्घा , अध्यात्म

प्रतिक्रिया

 1. Aparna Ranade

    4 आठवड्या पूर्वी

  अतिशय सुंदर रामरक्षाविवेचनवाचून खुप समाधान वाटले

 2. Aparna Ranade

    4 आठवड्या पूर्वी

  अतिशय सुंदर रामरक्षाविवेचनवाचून खुप समाधान वाटले

 3. मंदार केळकर

    4 आठवड्या पूर्वी

  विस्तृत विवेचन !!

 4. Pradnya26

    2 वर्षांपूर्वी

  माहितीपूर्ण... रामरक्षा विस्तृतपणे समजावले आहे.. तिचे महत्त्वही नीट विशद केले आहे. बाकी सोपस्कार मात्र पटत नाहीत

 5. anjali3065

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान ??

 6. amolss

    3 वर्षांपूर्वी

  आशयापेक्षा कर्मकांडाचाच अतिरेक जास्त झालाय असे वाटते.

 7. amolss

    3 वर्षांपूर्वी

  त्यातल्या आशयापेक्षा कर्मकांडाचा अतिरेक वाटतोय

 8. milindraj09

    3 वर्षांपूर्वी

  उत्तम अप्रतिम

 9. arkpune

    3 वर्षांपूर्वी

  उत्तमवाचण्यासारखे अजून काही ...