'नवा सुधारक' सुरु करताना...


नवा सुधारक,  एप्रिल १९९० आपली गरज काय आहे हे  शरिराला आणि समाजाला कधीच कळत नसते. त्यामुळेच शरिराला पोषक असलेली तत्वे बेचव वाटतात आणि समाजाच्या भल्यासाठी आवश्यक असलेले विचार अनाकर्षक वाटतात. अशा परिस्थितीतही समाजाला हलवून सतत जागे ठेवण्याचे व्रत अनेकजण स्वतःहून घेत असतात.  जोवर शक्य आहे तोवर त्याचे कसोशीने पालनही करत असतात. समाजाला विवेकाचा विचार देणारी आजवर निघालेली नियतकालिके अशाच खटपटीतून निघालेली आहेत. गोपाळ गणेश आगरकरांनी  १८८८ साली सुरू केलेले  'सुधारक' हे साप्ताहिक त्यातलेच एक. आगरकरांच्या अकाली निधनामुळे ते १८९६ साली बंद पडले. परंतु त्याचा प्रभाव एवढा होता की त्यानंतर ९४ वर्षांनी पुन्हा त्याच नावाचा वारसा पुढे चालवला पाहिजे असा विचार करून दि.य. देशपांडे यांनी 'नवा सुधारक' या नावाने ते मासिक स्वरूपात पुन्हा सुरु केले. कालांतराने त्याचे नाव 'आजचा सुधारक' असे झाले. दि.य. देशपांडे यांच्या नंतर आणखी काही संपादक झाले आणि अखेर २०१७ साली 'आजचा सुधारक'ही बंद पडले. परंतु या काळात त्याने  वेैचारिक विवेकाचा दिवा सतत तेवत रहावा यासाठी अविरत प्रयत्न केले. १९९० साली 'नवा सुधारक' सुरु करताना दि.य. देशपांडे यांनी पहिल्या अंकात लिहिलेली भूमिका म्हणजेच प्रस्तुतचा लेख होय.  आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रसार करणे तुलनेने कमी खर्चाचे झालेले असताना आता सुधारकाचा आणखी एखादा अवतार यायला हरकत नाही, असे हा लेख वाचून नक्कीच वाटते- ‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिक , मराठी नियतकालिकांचा इतिहास , दि. य. देशपांडे , नव सुधारक

प्रतिक्रिया

  1. vilasingle

      5 वर्षांपूर्वी

    नक्कीच सुधारक निर्माण झालेच पाहिजे

  2. Sunanda

      5 वर्षांपूर्वी

    खरोखरच आणखी एका सुधारकाची गरज आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen