चवदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास.

पुनश्च    राहुल बनसोडे    2019-03-28 19:00:25   

समाजातल्या वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला वर्चस्वात ठेवण्यासाठी त्यांच्या अन्न आणि पाणी ह्या दोन जिवनावश्यक घटकांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उदाहरणांनी अवघा मानव इतिहास बरबटलेला आहे. ह्या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास खालच्या वर्गाच्या जगण्यासाठीच्या हतबलतेचा वापर करुन मोठमोठी साम्राज्ये निर्माण करता आली. कधीकाळच्या ह्या उत्तुंग साम्राज्यांच्या खाणाखुणा मागे राहिलेल्या त्यांच्या बांधकामात दिसुन येतात, त्या बांधकामाच्या तळाशी असलेले शोषितांचे अश्रु वा त्यांचा हिशेब कुणाच्या खिजगणतीतही नसतो. खिज गणती म्हणजे अशी गणती जी सार्वजनिक केली जात नाही कारण मग तिच्यावर टॅक्स बसतो, इतरांना आपल्याकडे असलेल्या वास्तव मालमत्तेबद्दल कळते. खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवुन ठेवलेले सत्य, एक असे सत्य जे माहित असणारा माणुसही स्वतःच स्वतः आठवु इच्छीत नाही कारण स्वतःपुरते आठवले तरी तो कुठेतरी ते बोलुन बसेल आणि त्यातुन मग पुढे त्याला समस्या निर्माण होईल. महाड गावाजवळून सावित्री नदी वहाते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येते. भारतात ज्या ज्या म्हणुन नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रीयांच्या नावाने ठेवली गेली आहेत त्या त्या नद्यांच्या गावाजवळचा इतिहास तपासुन पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात. अस्पृश्यता शब्द काढुन तिथे 'मुलभूत मानवी अधिकारांची पायमल्ली' अशी शब्दयोजना केल्यास जास्त योग्य होईल. तर ह्या तथाकथीत सावित्री नदीच्या नैसर्गिक स्वभावाचा विचार केला तर तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावल्यानंतर ती आपल्या साठेक मैलाच्या प्रवासात असंख्य वळणे घे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , अवांतर , राहुल बनसोडे , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. hemant.juwekar

    3 वर्षांपूर्वी

  खुपच माहितीपूर्ण आणि उत्तम लेख. फक्त चौदार तळे असा उल्लेख सुरुवातीला आहे. दार असलेले तळे असा त्याचा अर्थ असावा. पण नंतर शेवटाकडे चवदार तळे असा शब्द प्रयोग होताना दिसतो. तो चौदार असाच असायला हवा होता काय?

 2. Mahesh40

    3 वर्षांपूर्वी

  Apratim! Very nice.

 3. Aaidada

    3 वर्षांपूर्वी

  इतकी सविस्तर ह्या घटनेची माहिती नव्हती त्याबद्दल धन्यवाद. प्रखर जातीयवाद थोडा फार कमी झाला आहे पण पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे ही आपल्या विकसनशील देशासाठी काळजी करावी अशी बाब आहे

 4. Reewa

    3 वर्षांपूर्वी

  चौदार तळे आणि डॉ. आंबेडकर यासंबंधी थोडी माहिती होती. मात्र आपल्या या सविस्तर लेखामुळे माणुसकीला काळीमा म्हणजे काय, याची नुसत्या कल्पनेनेच प्रचिती येऊ शकते. आणि प्रत्यक्ष तिथे गेल्यावर काय वाटते ते शब्दांत वर्णन करण्या पलिकडचे आहे. धन्यवाद!

 5. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  वा: वाचून सद्गदित झालो. अप्रतिम लेख!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen