भगतसिंगांवरील खटल्याची पुन्हा सुनावणी ?

आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंगांचे स्थान काय? त्यांचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरणे योग्य ठरेल? महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाचे आजवर केले जाणारे मूल्यमापन पुरेसे समतोल आहे का?

या आणि अशाच इतर काही प्रश्नांची राष्ट्रीय चित्रवाहिन्यांवर अलीकडेच ओझरती चर्चा ऐकायला मिळाली आणि ती ऐकत असताना जाणवले की, या सार्‍या प्रश्नांपेक्षाही अधिक गांभीर्याने विचारात घ्यायला हवा आहे, तो प्रश्न वेगळाच आहे. सुमारे 86 वर्षांपूर्वी- दि. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी भगतसिंगांना फाशी देण्यात आले होते. ती शिक्षा त्यांना ज्या खटल्यातील आरोपी म्हणून ठोठावण्यात आली होती, तो खटला न्यायसुसंगत तत्त्वांशी प्रामाणिक राहून चालवला गेला होता काय, हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे आणि जर त्या प्रश्नाचे उपलब्ध पुराव्यांनिशी नकारार्थी उत्तर मिळवता येत असेल, तर त्या निमित्ताने ब्रिटिश राजवटीच्या तथाकथित न्यायबुध्दीलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे शक्य होईल का, हा उपप्रश्न वेगवेगळ्या संदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. त्याबद्दलची काहीशी प्रकाशझोतात न आलेली माहिती वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘शब्दमल्हार’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘शब्दमल्हार’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. Sadhana

    गांधीनी भगतसिहांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही येवढेच माहीत होते. ह्या मागचा इतिहास शेयर केल्याबद्दल श्री हर्डीकर याचें आभार.

Leave a Reply