रविन्द्रनाथांची कविता


७ मे... गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.... या निमित्ताने २००९ साली मी केलेल्या त्यांच्या दोन कवितांचा स्वैर अनुवाद.... Stray Birds आणि My Song...

 ( चित्रकार  : अन्वर हुसेन )

 

भटके पक्षी’ (Stray Birds)

वैशाखीच्या उन्हात न्हाऊन येती गात हे भटके पक्षी
विसावता क्षणी खिडकीवरल्या झरोख्यातून उडून जाती

पानगळीच्या येत नशिबी पीतपर्ण ते अवघे भारुन
थकूनि पडते, पडूनि थकते, नि:शब्दांचे भरुन अंगण..........

© श्रीनिवास नार्वेकर (१७.०३.०९ मध्यरात्री २.२६ वा.)

माझे गाणे’ (My Song)

अलवार सूरांची छेडीत नक्षी लहरत येई माझे गाणे

सभोवताली गुंफून बाहू जणू मायेचे वक्षी कोंदणे
                       
स्पर्शूनी जाई माझे गाणे आभाळलेल्या तुझ्या ललाटी
गूज कुजबुजे तुझ्या अंतरी एकाळलेल्या तुझ्याचसाठी

स्वप्नामधूनी विहरत राही, पंखांच्या या क्षितिजावरती
गर्दीमधूनि, माझे गाणे, फिरे सदोदीत तुझ्याभोवती
                       
बोल हृदयीचे छेडूनि जाई, असीम असत्या सीमेवरती
अंधारलेल्या काजळराती, माझे गाणे, ध्रुव दाखवी

तुझ्या दिसावे नयनी गाणे, माझे गाणे... माझे गाणे...
जुळून यावे सूर अंतरी, तुझे नि माझे एकच गाणे...
                       
निजतील माझे डोळे जेव्हा, संपेल माझ्या मुखी तराणे
तुझ्या वसावे हृदयी निरंतर, माझे गाणे... माझे गाणे...

© श्रीनिवास नार्वेकर (१७ मार्च २००९ मध्यरात्री ३.२६ वा.)


कविता , अनुवाद
ललित

प्रतिक्रिया

  1. Shriniwas Narwekar

      4 वर्षांपूर्वी

    अभिप्रायाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼 - श्रीनिवास नार्वेकर

  2. Seema Joshi

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  3. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    किती सुरेख भाषांतर, वाह

  4. Anant Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    7अगस्त१८६१ ऐवजी७मे१८६१ असे वाचावे.

  5. Anant Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    सात ऑगस्ट अठराशे 61 ही गुरुदेवांची जन्मतारीख. यानिमित्ताने त्यांच्या कवितांचे उत्तम भाषांतर करणाऱ्या नार्वेकर यांचे अभिनंदन! रवींद्रनाथांनी गीतांजली काही काव्ये 1909 मध्ये लिहिली . पुढे 1912 मध्ये इंग्लंडला जाताना त्यांनी बोटीवर त्यातल्या कवितांचे भाषांतर इंग्लिश मध्ये केले. त्याच वर्षी जून तीस तारखेला या कवितांचे केंब्रिज येथे रसिक साहित्यप्रेमी समोर वाचन झाले आणि एका वैश्विक आणि अद्भुत प्रतिभेचा साक्षात्कार साहित्य जगताला झाला. पुढे 1913 च्या नोव्हेंबर 13 तारखेला शांतिनिकेतन येथे गीतांजली ला नोबेल प्राईज मिळाल्याची बातमी आली. या दोन भाषांतरित कवितांनी गुरुदेव टागोरांच्या अलौकिक जीवनाचे पुन्हा एकदा स्मरण करून दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे धन्यवाद !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen