बांदेकरांना १९५९ सालची लोकसंख्या ही गर्दी वाटली तर आजच्या गर्दीला त्यांनी काय म्हटले असते असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. की पूर्वीपासून लोकसंख्येच्या मानाने सुखसोई वा साधने ह्यांची कमतरता राहिल्याने तेव्हाची लोकसंख्याही बांदेकरांना गर्दी वाटली असे म्हणायचे?
ह्या लेखानंतर लगेच काळाने बांदेकरांना नेणे ह्याला दैवदुर्विलास नाही तर काय म्हणायचे?
सन 1959 नंतरदेखील आजही तीच परिस्थिती आहे. फक्त इंग्रजी शाळा वाढल्या आणि मराठी शाळा कमी होत गेल्यात. मराठी शाळेत एकाच वर्गात निरनिराळ्या इयत्तांची मुले एकत्र बसूनसुध्दा वर्ग भरत नसल्यामुळे तेथेच फक्त ऐसपैस बसता येते.
दत्तू बांदेकरांचा १९५९ सालचा लेख अप्रतिम आहे.... त्यांचे अफलातून निरीक्षण आणि उपरोधिक शैली भावली. त्यांनी वर्णन केलेली १९५९ सालची मुंबई आणि आजची मुंबई यात काडीचा फरक नाही... तपशिलात किरकोळ बदल करून हाच लेख आजच्या तारखेने छापला तरी कुणाला कळणार देखील नाही की हा १९५९ सालचा लेख आहे.
मुंबई हे एक विलक्षण रसायन आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथांमधील मुंबईचे वर्णन वाचले तर ते देखील असेच आहे.. एवढच नाही तर गोविंद नारायण माडगावकर यांचे १८६३ (अठराशे त्रेसस्ठ) साली प्रसिद्ध झालेले “मुंबईचे वर्णन” हे पुस्तक वाचले तर सहज लक्षात येते की त्यावेळची मुंबई आणि आजची मुंबई यात फारसा फरक नाही.
दोन उदाहरणे देतो..
1) वर्षातून तीन चार महिनेपर्यंत कुत्रे मारावे असा एक या शहरात सरकारी कायदा होतं. त्याबरहुकूम प्रतिवर्षी जाहिराती छापून नाकोनाकी चिकटवीत. ... मग सरकारी शिपाई आणि कुत्रेमारू लोकं रस्तोरती फिरून सापडेल त्या कुत्र्यास मारून टाकीत आणि त्याबद्दल त्यांस दर कुत्र्यास आठ आणे मिळत.. ( आजही भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम चालू आहे)
2) सन १८६१ माहे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील बहुतेक व्यापारी आणि सरकारी हुद्येवाल्या गृहस्थांनी सरकारास असा अर्ज केला की, मुंबईत दिवसेंदिवस जाग्याचा फार संकोच होत चालल्यामुळे किल्यातील राहणारांस फार अडचण पडत्ये, तर किल्याचे फक्त दक्षिण व पूर्व बाजूकडील तट कायम ठेवून बाकीचे सर्व मोडून त्याच्या भोवताले पाण्याचे चर आहेत ते बुजवून टाकून ही जागा कांपाच्या मैदानास मिळवावी. आणि ती लोकांस घरे, हपिसे, बंगले बांधण्यासाठी फरोक्त करून टाकावी. येणे करून दोन फायदे होतील. एक लोकास विस्तीर्ण जागा सापडेल व दुसरे ही जागा विकली की सरकारास पुष्कळ द्रव्य उत्पन्न होईल...( आजही मिठागरांच्या जागांवर घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे)
मुंबई नगरी बडी बांका...
दत्तू बांदेकर यांना निव्वळ अलौकिक प्रतिभेचे जे वरदान लाभले होते त्याचा आविष्कार आपण वर दिलेल्या लेखांतून होतो. या बांदेकरांनी लिहिलेल्या आणि अशा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय ? आपणच हे करावे असे मी म्हटले तर कुणाची हरकत नसावी.
मंगेश नाबर
अंतर्मुख झालो हा लेख वाचून...दत्तू बांदेकरांचे लेखन यापूर्वी वाचले नव्हते पण वाचकाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे. उपरोधाचा खूप चांगला वापर त्यांनी केलाय.बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे नाईलाजाने कराव्या लागणार्या तडजोडीचे चित्रण अंगावर येणारे आहे.या परीस्थितीतून आपण सगळे कधी ना कधी गेलेलो असल्यामुळे १९५९सालचा हा लेख वाचताना दत्तू बांदेकरांचे द्रष्टेपण लक्षात येते. क्या बात...!
नवीन सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
सभासद होण्यासाठी
सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
Install on your iPhone : tap and then add to homescreen
Install on your iPad : tap and then add to homescreen
ugaonkar
6 वर्षांपूर्वीछान .जरा विरंगुळा !
sureshjohari
7 वर्षांपूर्वीखूप मस्त . आवडला
Apjavkhedkar
7 वर्षांपूर्वीलेख फार जुनाआहे पण मास्तआहेअथात सध्याच्या काळाला पण लागु पडतो.
aghaisas
7 वर्षांपूर्वीबांदेकरांना १९५९ सालची लोकसंख्या ही गर्दी वाटली तर आजच्या गर्दीला त्यांनी काय म्हटले असते असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. की पूर्वीपासून लोकसंख्येच्या मानाने सुखसोई वा साधने ह्यांची कमतरता राहिल्याने तेव्हाची लोकसंख्याही बांदेकरांना गर्दी वाटली असे म्हणायचे? ह्या लेखानंतर लगेच काळाने बांदेकरांना नेणे ह्याला दैवदुर्विलास नाही तर काय म्हणायचे?
[email protected]
7 वर्षांपूर्वीसन 1959 नंतरदेखील आजही तीच परिस्थिती आहे. फक्त इंग्रजी शाळा वाढल्या आणि मराठी शाळा कमी होत गेल्यात. मराठी शाळेत एकाच वर्गात निरनिराळ्या इयत्तांची मुले एकत्र बसूनसुध्दा वर्ग भरत नसल्यामुळे तेथेच फक्त ऐसपैस बसता येते.
kiranshelke
7 वर्षांपूर्वीpresent tens in past.
sureshjohari
7 वर्षांपूर्वीअप्रतिम
ajitpatankar
7 वर्षांपूर्वीदत्तू बांदेकरांचा १९५९ सालचा लेख अप्रतिम आहे.... त्यांचे अफलातून निरीक्षण आणि उपरोधिक शैली भावली. त्यांनी वर्णन केलेली १९५९ सालची मुंबई आणि आजची मुंबई यात काडीचा फरक नाही... तपशिलात किरकोळ बदल करून हाच लेख आजच्या तारखेने छापला तरी कुणाला कळणार देखील नाही की हा १९५९ सालचा लेख आहे. मुंबई हे एक विलक्षण रसायन आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथांमधील मुंबईचे वर्णन वाचले तर ते देखील असेच आहे.. एवढच नाही तर गोविंद नारायण माडगावकर यांचे १८६३ (अठराशे त्रेसस्ठ) साली प्रसिद्ध झालेले “मुंबईचे वर्णन” हे पुस्तक वाचले तर सहज लक्षात येते की त्यावेळची मुंबई आणि आजची मुंबई यात फारसा फरक नाही. दोन उदाहरणे देतो.. 1) वर्षातून तीन चार महिनेपर्यंत कुत्रे मारावे असा एक या शहरात सरकारी कायदा होतं. त्याबरहुकूम प्रतिवर्षी जाहिराती छापून नाकोनाकी चिकटवीत. ... मग सरकारी शिपाई आणि कुत्रेमारू लोकं रस्तोरती फिरून सापडेल त्या कुत्र्यास मारून टाकीत आणि त्याबद्दल त्यांस दर कुत्र्यास आठ आणे मिळत.. ( आजही भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम चालू आहे) 2) सन १८६१ माहे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील बहुतेक व्यापारी आणि सरकारी हुद्येवाल्या गृहस्थांनी सरकारास असा अर्ज केला की, मुंबईत दिवसेंदिवस जाग्याचा फार संकोच होत चालल्यामुळे किल्यातील राहणारांस फार अडचण पडत्ये, तर किल्याचे फक्त दक्षिण व पूर्व बाजूकडील तट कायम ठेवून बाकीचे सर्व मोडून त्याच्या भोवताले पाण्याचे चर आहेत ते बुजवून टाकून ही जागा कांपाच्या मैदानास मिळवावी. आणि ती लोकांस घरे, हपिसे, बंगले बांधण्यासाठी फरोक्त करून टाकावी. येणे करून दोन फायदे होतील. एक लोकास विस्तीर्ण जागा सापडेल व दुसरे ही जागा विकली की सरकारास पुष्कळ द्रव्य उत्पन्न होईल...( आजही मिठागरांच्या जागांवर घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे) मुंबई नगरी बडी बांका...
Shridhar Godbole
7 वर्षांपूर्वीजरा सरकून घ्या म्हणणारा दुसरयाचे आयुष्य सरकून घेतो. एकदम मस्त बांदेकरसर
mangeshnabar
7 वर्षांपूर्वीदत्तू बांदेकर यांना निव्वळ अलौकिक प्रतिभेचे जे वरदान लाभले होते त्याचा आविष्कार आपण वर दिलेल्या लेखांतून होतो. या बांदेकरांनी लिहिलेल्या आणि अशा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय ? आपणच हे करावे असे मी म्हटले तर कुणाची हरकत नसावी. मंगेश नाबर
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीशेवट ध:स्स झाल. असो. आगगाडीत तर चौथीला बसताना तिसरीला सरका सांगून पुरत नाही.दूसरीला पहिलीला सांगा तरच
bookworm
7 वर्षांपूर्वीअंतर्मुख झालो हा लेख वाचून...दत्तू बांदेकरांचे लेखन यापूर्वी वाचले नव्हते पण वाचकाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे. उपरोधाचा खूप चांगला वापर त्यांनी केलाय.बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे नाईलाजाने कराव्या लागणार्या तडजोडीचे चित्रण अंगावर येणारे आहे.या परीस्थितीतून आपण सगळे कधी ना कधी गेलेलो असल्यामुळे १९५९सालचा हा लेख वाचताना दत्तू बांदेकरांचे द्रष्टेपण लक्षात येते. क्या बात...!