ठणठणपाळांनीही हातोडा फेकून दिला असता!


मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला तरी हातातला मद्याचा ग्लास गेल्या कित्येक वर्षात फेकून मारलेला नाही. (याचा अर्थ कोणे एके काळी फेकून मारला होता. शोधा म्हणजे सापडेल.) कुठलाही मराठी समीक्षक कुठल्याही लेखकाचे लिखाण फालतू आहे, असं म्हणत नाही. कोणताही प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकाकडे पाहून छद्मी हसत नाही. मुळात छद्मी हसायचे म्हणजे काय हेच मराठी साहित्य विश्वातले लोक विसरले आहेत. कोणत्याही कवीला कोणताही दुसरा कवी आणि त्याची कविता रद्दी वाटत नाही. अशा सुस्त वातावरणात वर्षातून किमान एकदा तरी वादाचा धुरळा उठत असे. एकदा तरी उखाळ्या पाखाळ्या काढल्या जात, एकदा तरी कोणीतरी कोणासमोर तरी उभे ठाकत असे. एकदा तरी एखाद्याविषयी तरी कोणी तुच्छतेने बोलत असे...काय त्या श्रीपाद जोशींना आणि साहित्य महामंडळाला अवदसा आठवली आणि त्यांनी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द करून त्या ऐवजी सर्वसमंतीने निवडण्याची सपक योजना आणली. साहित्य संमेलन निवडणूक म्हणजे कसा झणझणीत रस्सा होता. जोशींनी त्याचा पार वरणभात करून टाकला. विदर्भाला सगळे काही झणझणीत  लागते हा समजच त्यांनी खोटा ठरवून टाकला. त्यांचा त्रिवार निषेध. अहाहा काय ते दिवस होते, गेले ते !

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपरोध

प्रतिक्रिया

  1. Rajiv Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    भारीच 👌👌👌👌👌👌सगळे संदर्भ जुळतात...😄😄😄😄

  2. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    छान. खुसखुशीत.

  3. SubhashNaik

      6 वर्षांपूर्वी

    भन्नाट तंबी दुराई. ! ठणठणपाळाची आठवण करून देणारा जबरदस्त लेख. - सुभाष नाईक.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen